आम्ही दोघी संसदेत का हसलो???, अखेर रक्षा खडसेंनी सांगितलं कारण

जळगाव : लोकसभेत चर्चेच्या वेळी दिंडोरीच्या भाजपच्या खासदार डॉ. भारती पवार या मराठीतून भाषण करत होत्या. त्यावेळी खासदार प्रीतम मुंडे आणि खासदार रक्षा खडसे या हसत असतानाचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हीडिओवर खासदार रक्षा खडसेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

संसदेत मी आणि खासदार प्रीतम मुंडे आम्ही सहज हसत होतो. त्याचा भारती पवार यांच्या भाषणाशी काहीही संबंध नाही, असं म्हणत रक्षा खडसे यांनी सारवासारव केली आहे.

देशातील अनेक महत्वाच्या विषयावर आम्ही चर्चा करतो. त्याकडे लक्ष दिलं जात नाही. आम्ही सहज हसलो हा विषय गंभीरपणे घेण्याची गरज नाही, असंही रक्षा खडसे म्हणाल्या आहेत.

भारती पवारांच्या भाषणाला हसलो नाही तर याउलट त्यांना पाठिंबा देण्यासाठीच आम्ही थांबलो होतो. राष्ट्रवादी काँग्रेस या विषयाचे भांडवल करत आहे, असा आरोप रक्षा खडसेंनी केला आहे.

माध्यमांनी चांगल्या कामाची प्रसिद्धी करावी. त्या मुंडेंच्या कन्या आहेत आणि मी एकनाथ खडसेंची सून आहे. म्हणून आम्ही हसलो असं म्हणणं योग्य नाही, असंही रक्षा खडसे म्हणाल्या आहेत.

दरम्यान, डॉ. भारती पवार याही नवीन खासदार आहेत. आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत, असं त्यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-युतीत बंडखोरीची शक्यता; परभणीत भाजपला हव्यात शिवसेनेच्या जागा

-“नारायण राणे या मतदारसंघातून लढणार”

-दोघी खुदकन हसल्या अन् टेबलामागे दडल्या; सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु

-मोबाईल तसेच लॅपटॉपवर ‘पॉर्न’ पाहणाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी

-रात्रीच्या अंधारात मुख्यमंत्र्यांना कोण-कोण भेटतं; चंद्रकांत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट