देश

दोघी खुदकन हसल्या अन् टेबलामागे दडल्या; सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु

नवी दिल्ली | भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसे यांचा संसदेतील एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हीडिओत दोघीजणी खदखदून हसताना दिसत आहेत, तसेच टेबलखाली लपताना दिसत आहेत.

भाजपच्याच दुसऱ्या खासदार भारती पवार सभागृहात बोलत असताना हा प्रकार घडला. यावेळी त्या शेतकरी कर्जमाफी केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानत होत्या.

भारती पवार यांनी जसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले तशा दोघी खदखदून हसल्या आणि टेबलखाली लपल्या. थोड्या वेळाने त्या पुन्हा वर आल्या. हा सारा प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.

कर्जमाफीचं श्रेय भारती पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्यानं दोघी असल्या, अशी चर्चा सध्या सोशल मीडियात सुरु आहे. तसंच हा व्हीडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दोघी नेमक्या का हसल्या याचं कारण अद्याप समोर येऊ शकलेलं नाही. मात्र सत्ताधारी बाकांच्या समोर विरोधकांची बाकं असतात त्यामुळे समोरच्या बाकांवर काही विनोद सुरु होता का? ज्यामुळे दोघींना हसू अनावर झालं याची चर्चा सध्या सुरु आहे.

भाजप कडक शिस्तीचा पक्ष मानला जातो. संसदेत हजर राहण्याची सक्ती भाजपकडून आपल्या खासदारांना केली जाते. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी खासदारांच्या हजेरीबाबत आग्रही असतात. पक्षशिस्त न पाळणाऱ्या तसेच वारंवार गैरहजर राहणाऱ्या खासदारांना नरेंद्र मोदी यांनी नुकतीच तंबी दिली होती.

आता खासदार प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसे यांचा संसदेतील धक्कादायक व्हीडिओ समोर आला आहे. त्यामुळे भाजप या प्रकरणाची चौकशी करणार का? संसदेत शिस्तीचा आग्रह धरणारे नरेंद्र मोदी या प्रकरणी काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

पाहा व्हीडिओ-

महत्वाच्या बातम्या-

मोबाईल तसेच लॅपटॉपवर ‘पॉर्न’ पाहणाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी

-रात्रीच्या अंधारात मुख्यमंत्र्यांना कोण-कोण भेटतं; चंद्रकांत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट

-‘बीव्हीजी’चे मालक हणमंतराव गायकवाडांना 16 कोटी रुपयांना फसवलं

-काँग्रेस-राष्ट्रवादी मोठ्या फुटीच्या उंबरठ्यावर; हे 13 दिग्गज सेना-भाजपच्या वाटेवर

-…तर या दिवशी प्रकाश आंबेडकर, अजित पवार आणि राज ठाकरे एकाच मंचावर?

IMPIMP