विजयालक्ष्मी अर्थात दसऱ्याच्या दिवशी भगवान श्रीरामाने रावणावर विजय मिळवला होता. हा दिवस विजयपर्व म्हणून साजरा केला जातो, तसेच याच दिवशी शस्त्रास्त्रांची पूजा देखील केली जाते.
तुम्हाला माहित आहे का की कुंडलीत फक्त एक छोटासा फरक असल्यानं प्रभू रामानं रावणावर विजय मिळवला होता. जाणून घेऊया प्रभू रामाच्या कुंडलीत काय चांगलं होतं आणि रावणाच्या कुंडलीत नेमका कुठला दोष होता ज्यामुळे त्याच्यावर मरण ओढवलं.
भगवान रामाची कुंडली कर्क लग्नाची आहे आणि रावणाची कुंडली सिंह लग्नाची आहे. दोघांच्या लग्नात विद्यमान बृहस्पती असल्यानं दोघंही महान शक्तिशाली योद्धा बनतात, मात्र रामाचा बृहस्पती लग्नात परमोच्च आहे जो त्यांना आणखी शक्तिशाली बनवतो.
रावणाच्या कुंडलीत राहू असल्याने त्याची मती भ्रष्ट झाली होती आणि त्यामुळेच त्याला राक्षस गणात टाकण्यात आलं आहे. लग्नात पंचमेश आणि दशमेश यांची युती देखील आहे. मात्र असं असलं तरी शनी आणि बुधच्या प्रभावामुळे रावण प्रचंड बुद्धीमान आणि ज्ञानी होता, तसेच तो पराक्रमीही होता, ज्यामुळे त्याला पराभूत करणं एक महाकठीण काम होतं.
प्रभू राम आणि रावणाची कुंडली पाहिली तर रामांचा बृहस्पती रावणावर भारी पडला आणि त्याचा पराभव झाला. रावणाचा वध होण्याचं हेही एक महत्त्वाचं कारण होतं. रावणाचा पराभव केल्यानंतर प्रभू राम सीतेला घेऊन अयोध्येला परत आले होते.
रावण दहनाच्या आधी देवीचं आणि प्रभू श्रीरामाचं स्मरण करायला हवं. रावणाचा पुतळा जाळताना प्रभू रामाचं स्मरण करावं तसेच पुतळा जळत जळून झाल्यानंतर देवीची तसेच प्रभू रामाची आरती करावी.
पुतळा दहनाच्या कार्यक्रमानंतर घरातील सर्व सदस्यांनी एकत्र यावं. सर्वांच्या प्रगतीसाठी प्रार्थना करावी, तसेच आयुष्यात येणाऱ्या अडीअडचणींचा नायनाट व्हावा यासाठी मनोभावे प्रार्थना करावी.
दसऱ्याच्या दिवशी माँ दुर्गेची देखील पूजा केली जाते. दुर्गेने महिषासूर राक्षसाचा वध केला होता, त्यामुळे तिला महिषासूर मर्दिनी देखील म्हटलं जातं. चांगल्याचा वाईटावर विजय म्हणून दसरा साजरा केला जातो, त्यामुळे या दिवशी दुर्गेची पूजा होते.
महत्त्वाच्या बातम्या-
धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीला एनसीबीनं ड्र.ग्ज घेताना रंगेहात पकडलं
तुम्हालाही चमकदार त्वचा हवी आहे का? मग ‘हे’ उपाय जरूर करा
…मी फक्त ‘या’ एका गोष्टीसाठी लग्न केलं; राधिका आपटेचा धक्कादायक खुलासा
महेश भट्ट गजाआड जाणार? ‘या’ बड्या अभिनेत्रीचे महेश भट्ट यांच्यावर धक्कादायक आरोप!
पक्षांतर करताच कोणी किती भूखंड घेतलेत असं म्हणत एकनाथ खडसेंचा मोठा खुलासा!