महाराष्ट्र मुंबई

वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजप आमदार राम कदम पुन्हा वादात; पाहा नवीन व्हीडिओ

मुंबई : घाटकोपरचे भाजप आमदार राम कदम यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेला वाद नुकताच कुठे शांत झाला होता. मात्र राम कदम यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या नव्या व्हीडिओमुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलं आहे. राम कदम यांनी स्वतःच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हीडिओ शेअर केला आहे.

राम कदम यांच्या व्हीडिओत काय आहे?

राम कदम यांनी शेअर केलेल्या व्हीडिओत 18 वर्ष पूर्ण केलेल्या तरुणांना मतदार नावनोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. स्वतः राम कदम हे आवाहन करताना दिसत आहेत. मतदार नावनोंदणी करण्याचं आवाहन करणं चांगलं असलं तरी राम कदम मात्र या व्हीडिओत त्याबदल्यात तरुणांना काही गोष्टी देण्याचं अमिष दाखवत आहेत. 

अलिशान गाड्यांमधून फिरणे, मोठमोठ्या फिल्म स्टार्सना भेटण्याचं तसेच तिरुपतीच्या यात्रेला नेण्याचं अमिष राम कदम दाखवत आहे. हे सर्व फ्री असेल. या सगळ्या गोष्टीच्या पाठिमागे तरुणांना प्रेरणा मिळावी, अशी आपली भूमिका असल्याचं राम कदम यांनी म्हटलंय. राम कदम यांच्या या व्हीडिओमुळे त्यांच्यावर पुन्हा एकदा टीकेची झोड उठवली जात आहे. 

नक्की काय म्हणाले राम कदम-

राम कदमांच्या व्हीडिओवर आक्षेप-

राम कदम यांनी ट्विटरवर हा व्हीडिओ टाकताच अनेक उलटसुलट प्रतिक्रिया येऊ लागल्या. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या व्हीडिओवर जोरदार आक्षेप घेतला. मतदार होण्यासाठी कदम मुलांना अमिष दाखवत आहेत, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. 

दहीहंडीवेळी अडकले होते वादात-

दहीहंडी सोहळ्यात वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे राम कदम नुकतेच वादात सापडले होते. तुम्हाला पसंत असलेली मुलगी दाखवा, मी तिला उचलून आणतो, अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी जाहीर कार्यक्रमात केलं होतं. यावरुन त्यांच्यावर जोरदार टीका सुद्धा झाली होती. तो वाद अजूनही पूर्ण निवळलेला नाही. 

IMPIMP