महाराष्ट्र मुंबई

पहिलं पोरी पळवायचा आता मच्छर पळवतो; नव्या व्हीडिओमुळे राम कदम पुन्हा ट्रोल

मुंबई | भाजप आमदार आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नुकतेच वादात सापडले होते. त्यावेळी त्यांना मोठ्या टीकेचा सामना करावा लागला होता. मात्र काही महिने उलटल्यानंतरही लोकांचा त्यांच्यावरचा रोष कमी होत नसल्याचं दिसत आहे. राम कदम घाटकोपर मतदारसंघातून आमदार आहे. मतदारसंघातील नागरिकांसाठी ते काही ना काही नाविन्यपूर्ण योजना राबवत असतात. अशाच एका योजनेमुळे त्यांना पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या टीकेचा सामना करावा लागला आहे. राम कदम यांचं फेसबुक पेज आहे. या पेजवर नेटकऱ्यांनी त्यांना जोरदार ट्रोल करण्यात केलं आहे. या प्रकाराची सध्या सोशल मीडियामध्ये देखील एकच चर्चा रंगली आहे.

नेमका काय आहे प्रकार?

राम कदम आपल्या घाटकोपर या मतदारसंघात नाविन्यपूर्ण तसेच लोकप्रिय योजना राबवत असतात. दिवाळीच्या निमित्ताने घाटकोपरमधील सुरक्षारक्षकांसाठी त्यांनी अशीच एक योजना राबवली. मच्छरांमुळे सुरक्षारक्षकांना त्रास होतो त्यामुळे सुरक्षारक्षकांना ओडोमॉसचं वाटप करण्याचा निर्णय राम कदम यांनी घेतला. यासंदर्भात त्यांनी स्वतःच्या फेसबुक पेजवरुन माहिती दिली. त्याचा व्हीडिओ देखील त्यांनी फेसबुकवर पोस्ट केला. त्यामध्ये ते या योजनेबद्दल माहिती देताना दिसत आहेत.

पाहा व्हीडिओ-

नेटकऱ्यांनी हल्ला चढवला-

राम कदम यांना या व्हीडिओमुळे ट्रोल व्हावं लागलं आहे. त्यांच्या मुली पळवण्याच्या वक्तव्याचा संबंध अनेकांनी या व्हीडिओशी लावून कमेंट केल्या आहेत.

IMPIMP