“सरकारचा पहिला निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा असेल अशी आशा होती पण…”

मुंबई |  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिली पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आरे कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याचा मोठा निर्णय जाहीर केला. यावरच भाजप नेते आणि आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. पहिला निर्णय शेतकऱ्यांसाठी होईल अशी आमची अपेक्षा होती परंतू दुर्दैवाने तसं होताना दिसलं नाही, असं ते म्हणाले आहेत.

वास्तविक अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालंय. त्यांना भरीव निधीची घोषणा नवीन सरकार देईल, अशी अपेक्षा होती. परंतू तसं झालं नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मुंबईच्या विकासासाठी काम केलं. नवीन सरकारने काय निर्णय घ्यायचे हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे परंतू मुंबईचा विकास थांबू नये असंच वाटत असल्याचं राम कदम यांनी यावेळी सांगितलं.

आरेला केवळ राजकीय मुद्दा म्हणून शिवसेना पाहत आहे. परंतू मुंबईच्या विकासासंबंधी नव्या सरकारने निर्णय घ्यावेत, असं ते म्हणाले.

दुसरीकडे ‘आरे’संबंधी उद्धव यांनी घेतलेल्या निर्णयावर ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’, अशा शब्दात भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी निशाणा साधला.

 

महत्त्वाच्या बातम्या-