“संजय काकडेंची औकात नाही, कोण संजय काकडे”

मुंबई | भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी शुक्रवारी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी यावरुन काकडेंवर कडवट टीका केली आहे.

संजय काकडेंची पंकजा मुंडेंवर टीका करण्याची औकात नाही. पंकजांच्या वाहनचालकाची सुद्धा काकडे बरोबरी करु शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी तोंड सांभाळून बोलावं. तसेच कोण संजय काकडे, असं म्हणत त्यांनी निशाणा साधला आहे.

स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यामुळेच संजय काकडे खासदार झाले. मात्र प्रसिद्धीत राहण्याच्या हव्यासापोटी ते तोंडसुख घेत आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत याच काकडेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांचे दारं ठोठावले होते, असंही कुलकर्णी म्हणाले आहेत.

दरम्यान, पंकजा मुंडे यांना आपला मुठभर मतदारसंघही सांभाळता आला नाही. त्यामुळे त्यांना भाजपने गांभीर्याने घेण्याची गरज नाही. त्यांच्यामुळे पक्षाला काहीही फरक पडत नाही, अशी टीका काकडे यांनी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या-