Ram Mandir l रामराजा मंदिर, मध्य प्रदेश :
मध्यप्रदेश येथील ओरछा येथे रामराजा मंदिर आहे. हे मंदिर खूपच प्रसिद्ध आहे. या मंदिरामागचं महत्व म्हणजे ओरछा येथील राणी कुंवरी गणेश ही रामाची भक्त होती असे म्हणे जात आहे. या राणी कुंवरी गणेशने त्याला (Ram Mandir) अयोध्येतून बालस्वरूपात आणले होते. यामुळे प्रभू रामाची मध्यप्रदेशात राजा म्हणून पूजा केली जात आहे.
काळाराम मंदिर, नाशिक, महाराष्ट्र :
महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेल्या नाशिक शहरातील पंचवटी परिसरातील काळाराम मंदिरात प्रभू राम वनवासात राहिले होते असे म्हणले जात आहे. तसेच 1782 मध्ये सरदार रंगराव ओढेकर यांनी जुन्या लाकडी मंदिराच्या जागेवर हे मंदिर बांधले होते. या मंदिरात भगवान राम, सीता तसेच लक्ष्मण यांच्या काळ्या पाषाणापासून बनवलेल्या मूर्ती असल्याचे दिसत आहे. आणि त्यांची उंची सुमारे 2 फूट आहे. (Ram Mandir)
रामास्वामी मंदिर, तामिळनाडू :
रामास्वामी मंदिर हे मंदिर 400 वर्षांपूर्वी राजा रघुनाथ नायकर यांनी कुंभकोणम तामिळनाडू येथे बांधले होते. या मंदिरात गर्भगृहात भगवान राम आणि देवी सीता यांच्या मूर्ती विवाहाच्या मुद्रेत एकत्र बसलेल्या पाहायला मिळू शकतात.
Ram Mandir l सीता रामचंद्रस्वामी मंदिर, तेलंगणा :
सीता रामचंद्रस्वामी मंदिर हे भारतातील खूपच प्रसिद्ध राम मंदिर आहे. सीता रामचंद्रस्वामी हे मंदिर तेलंगणातील भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यातील भद्राचलममध्ये आहे. या मंदिरात रामनवमीच्या दिवशी अनेक भाविक (Ram Mandir) दर्शनासाठी येत असतात. तसेच राम नवमीला भगवान राम आणि सीता यांचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न होतो. तसेच या मंदिराला भद्राचलम मंदिर म्हणून देखील ओळखले जाते.
त्रिप्रयार श्रीराम मंदिर, केरळ :
राम भक्तांना देशातील रामाचे मंदिर माहित असणं महत्वाचं आहे. त्रिप्रयार श्रीराम हे मंदिर भगवान राम त्रिप्रयारप्पन किंवा त्रिप्रयार थेवर म्हणून ओळखले जाते. तसेच भगवान श्रीकृष्ण या मंदिरात रामाच्या मूर्तीची पूजा करत असत असे मानले जात आहे. (Ram Mandir) याशिवाय भगवान श्रीकृष्ण हे जग सोडून गेले तेव्हा मूर्तीचे समुद्रात विसर्जन करण्यात आले होते. त्यानंतर ही मूर्ती तेथील काही मच्छिमारांना सापडली आणि त्यांनी ती केरळच्या चेट्टुवा भागात स्थापित केली असल्याची माहिती आहे.
News Title : Ram Mandir In India
महत्त्वाच्या बातम्या-
LIC Jeevan Dhara 2 l आयुष्यभर परताव्याची हमी मिळणार! LIC ची नवीन योजना लाँच
Kia Seltos l Kia कंपनीने लाँच केले Seltos चे 5 जबरदस्त मॉडेल! जाणून घ्या फीचर्स
Ram Mandir l घरबसल्या पाहता येणार भक्तांना राम मंदिर सोहळा! पहा कधी आणि कुठे
Horoscope l प्रभू रामाच्या आशिर्वादाने या राशींना आजचा दिवस जाणार लाभदायक