Ram Mandir Inauguration l राम मंदिरा संदर्भात सर्वात मोठी बातमी! केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Ram Mandir Inauguration l 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिर उदघाटन सोहळा संपन्न होणार आहे. यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राम मंदिर सोहळ्याच्या कार्यक्रमासाठीची सुरक्षा व्यवस्था देखील कडक करण्यात आली आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने एक परिपत्रक जारी (Ram Mandir) केलं आहे. यामध्ये केंद्र सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खोट्या आणि चुकीच्या बातम्या प्रकाशित न करण्यास सांगितले आहे. (Ram Mandir)

Ram Mandir Inauguration l नेमकं प्रकरण काय? :

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, “काही खोटे आणि बनावट मेसेज सोशल मीडियावर पसरवले जात (Ram Mandir) असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषत: सोशल मीडियावर जातीय सलोखा आणि सार्वजनिक सुव्यवस्था बिघडू शकते. या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने हे परिपत्रक जारी केले आहे.

अशातच 22 जानेवारीला राम मंदिराचे उद्घाटन होणार असून राम मंदिर सोहळ्यापूर्वी व्हीआयपी तिकिटे, राम मंदिराचा प्रसाद देण्याचा दावा करणाऱ्या अनेक बनावट लिंक्स सोशल मीडियावर दिसत आहेत. तसेच प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाच्या झटपट व्हीआयपी तिकिटांचा (Ram Mandir) दावा करणारा बनावट QR कोड देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

मात्र त्यानंतर मंदिर ट्रस्टने स्पष्ट केले होते की ट्रस्टने स्वतःच निवडक पाहुण्यांना अभिषेक कार्यक्रमासाठी आमंत्रण पाठवले आहे.त्यामुळे तो खोटा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Ram Mandir l अशातच शुक्रवारी (20 जाने.) रामलल्लांच्या मूर्तीचा एका फोटो व्हायरल झाला होता. मात्र त्या फोटोवरुन आता वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासंदर्भात राम जन्मभूमी (Ram Mandir) तीर्थक्षेत्राच्या मुख्य पुजाऱ्यांनी व्हायरल झालेल्या फोटोची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

News Title : Ram Mandir Inauguration

महत्त्वाच्या बातम्या-