Ram Mandir l अखेर आज अयोध्येतील राम मंदिर स्थापनेचा दिवस आला आहे. काही तासांत राम मंदिराच्या गर्भगृहात प्रभू रामललाची प्रतिष्ठापना होणार आहे. त्यामुळे जगभरातील रामभक्तांची जवळपास पाच शतकांची प्रतीक्षा संपणार आहे. देशातील आणि जगातील अनेक मान्यवर या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहेत. राम मंदिर सोहळ्याला 16 जानेवारीपासून सुरवात झाली आहे. आता या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सांगता होणार आहे.
आज रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी अयोध्या पूर्णपणे सज्ज झाली आहे. संपूर्ण अयोध्या फुलांनी आणि रोषणाईने सजवण्यात आल्याचे दिसत आहे. आज दुपारी 12.29 वाजता अभिषेक सोहळा होणार आहे.
Ram Mandir l तुम्ही येथे थेट कार्यक्रम पाहू शकता :
आता राम भक्तांना या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण तुम्ही घरबसल्या डीडी न्यूज आणि अनेक राष्ट्रीय वाहिन्यांवर पाहता येणार आहे. याशिवाय तुम्ही डीडी न्यूजच्या यूट्यूब चॅनेलवर सोहळ्याचे थेट प्रक्षेपण देखील पाहू शकता. डीडी न्यूजने अयोध्येत विविध ठिकाणी 40 कॅमेरे बसवले आहेत. ज्याद्वारे राम मंदिर मंदिर प्राण प्रतिष्ठानचे थेट प्रक्षेपण दाखवले जाईल. हा सोहळा अत्याधुनिक 4k तंत्रज्ञानामध्ये प्रसारित केला जाणार आहे.
किती वाजता होणार राम सोहळा?
राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम 22 जानेवारी रोजी दुपारी 12:29:08 ते 12:30:32 या वेळेत होणार आहे.
Ram Mandir l राम मंदिर किती मोठे आहे?
राम मंदिर नगारा शैलीत बांधले जात आहे. हे मंदिर 3 मजल्याचे असणार आहे. हा मंदिर परिसर एकूण 57 एकर आहे, त्यापैकी 10 एकरवर मंदिर बांधले गेले आहे. मंदिराची लांबी 360 फूट, रुंदी 235 फूट, उंची 161 फूट आहे. तसेच मंदिरात 5 मंडप आणि 318 खांब आहेत. एक खांब 14.6 फूट आहे. मंदिराचे जवळपास 55 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम 2024 अखेर पूर्ण होणे अपेक्षित आहे. मंदिराचा तळमजला म्हणजेच गर्भगृह तयार आहे. पहिला मजला देखील 80% पूर्ण झाला आहे.
News Title : Ram Mandir Live Program
महत्त्वाच्या बातम्या-
Horoscope l प्रभू रामाच्या आशिर्वादाने या राशींना आजचा दिवस जाणार लाभदायक
Ram Mandir Inauguration l राम मंदिरा संदर्भात सर्वात मोठी बातमी! केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
Sana Javed l शोएब मलिक अडकला तिसऱ्यांदा लग्नबंधनात! कोण आहे शोएबची तिसरी पत्नी
New OTT Release l या आठवड्यात घरबसल्या पाहा अॅक्शन-ड्रामा, रोमान्सने भरलेले चित्रपट
Hsc Student Hall Ticket l बारावीच्या विद्यार्थ्यांना ‘या’ तारखेपासून परीक्षेचे प्रवेशपत्र मिळणार