Ram Mandir Pran Pratishta l आजचा दिवस देशवासियांसाठी खास आहे. कारण अयोध्येत आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते काही वेळात प्रभू रामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर अयोध्येतील तयारी पूर्ण झाली आहे. प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी आजचाच दिवस (Ram Mandir Pran Pratishta) का नेमला हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या आजच्या दिवसाचे विशेष महत्व.
काय आहे आजच्या दिवसाचे महत्व?
अयोध्येच्या राम मंदिरात रामललाच्या अभिषेकाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. 22 जानेवारी 2024 हा अभिषेक दिन निश्चित करण्यात आला आहे. 16 जानेवारीपासून मूर्तीच्या अभिषेकाशी संबंधित सर्व विधी सुरू झाले आहेत.
तसेच अभिजित मुहूर्तावर शास्त्रीय परंपरेचे पालन करून प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम होणार असून अभिजीत मुहूर्त 22 जानेवारी रोजी दुपारी 12:29 वाजून 8 सेकंद ते 12:30 मिनिटे 32 सेकंदापर्यंत असेल. म्हणजेच प्राणप्रतिष्ठेची शुभ मुहूर्त हा फक्त 84 सेकंद असेल. (Ram Mandir Pran Pratishta)
या 84 सेकंदाबाबत आणखी बोलायचे झाले तर, आज शुभ मृगाशिरा नक्षत्र पहाटे 3 वाजून 52 मिनिटांनी सुरु होणार असून तसेच मंगळवार 23 जानेवारीला पहाटे 4 वाजून 58 मिनिटांपर्यंत हा मुहूर्त कायम राहणार आहे.
परंतु आज म्हणजेच 22 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजून 51 मिनिटे आणि दुपारी 12 वाजून 33 मिनिटांपर्यंत अभिजात मुहूर्त असणार आहे. त्यामुळे 22 जानेवारी 2024 चा मुहूर्त हा रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी निवडण्यात आला असल्याचे सांगण्यात येते.
Ram Mandir Pran Pratishta l राम मंदिर बनवण्यासाठी झाला इतका खर्च :
अशातच राम मंदिराच्या अभिषेकाची वेळ जवळ आली आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे खजिनदार गोविंद देव गिरी यांनी सांगितले की, तात्पुरत्या मंदिरात ठेवण्यात आलेली राम लालाची जुनी मूर्ती आज मंदिरात स्थापन होणाऱ्या नवीन मूर्तीसमोर ठेवण्यात येणार आहे.
तसेच राम मंदिराच्या उभारणीसाठी आतापर्यंत एकूण 1100 कोटी रुपये खर्च झाला आहे. मात्र अद्यापही मंदिराचे (Ram Mandir Pran Pratishta) काम पूर्ण झाले नाही, तसेच आणखी 300 कोटी रुपये लागणार असल्याची माहिती समोर आली आहे.
News Title : Ram Mandir Pran Pratishta
महत्त्वाच्या बातम्या-
Ram Mandir l घरबसल्या पाहता येणार भक्तांना राम मंदिर सोहळा! पहा कधी आणि कुठे
Horoscope l प्रभू रामाच्या आशिर्वादाने या राशींना आजचा दिवस जाणार लाभदायक
Ram Mandir Inauguration l राम मंदिरा संदर्भात सर्वात मोठी बातमी! केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
Sana Javed l शोएब मलिक अडकला तिसऱ्यांदा लग्नबंधनात! कोण आहे शोएबची तिसरी पत्नी
New OTT Release l या आठवड्यात घरबसल्या पाहा अॅक्शन-ड्रामा, रोमान्सने भरलेले चित्रपट