अहो, त्याचा 1 वर्षाचा मुलगा गेलाय हो… ढसढसा रडणारच की!

नवी दिल्ली |  कोरोनाने सामान्य माणसाची काय हालत करून ठेवलीये याची कल्पना देखील करवत नाही. अनेक मजूर शेकडो किलोमिटर अंतर पायी कापत निघाले आहेत. त्यांना घराची ओढ लागली आहे. मजुरांचे जथ्येच्या जथ्ये मूळ गावी परतत आहेत. एकूणच काळीज पिळवटून टाकणारे चित्र आहे. असाच हृदयाला पाझर फोडणारा एक फोटो सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. आणि तो फोटो आहे दिल्लीत काम करणाऱ्या राम पुकार याचा….!

राम पुकार हा दिल्लीत मोलमजुरी करतो. त्याचं मूळ गावं बिहार. त्याला एक वर्षाचा मुलगा होता. त्याचं कुटुंब सगळं मूळ गावी होतं. पण अचानक लॉकडाऊन झालं आणि त्याला त्याच्या मूळगावी जाता आलं नाही. काल-परवा त्याच्या बायकोचा त्याला फोन आला की आपला एक वर्षाचा मुलगा गेला… तो जागेवर कोसळला…. धायमोकलून रडायला लागला… आणि कुणीतरी तो फोटो आपल्या कॅमेरात कैद केला…!

त्याला मुलगा गेल्याची बातमी समजल्याबरोबर तो बिहारच्या दिशेने पायी चालू लागला. परंतू गाझिपूरच्या पोलिसांनी त्याला अडवलं. त्यापुढे जाण्यास त्याला परवानगी दिली नाही. आपल्या एका वर्षाच्या मुलाचं तोंड देखील त्याला पाहता आलं नाही. वडिलांविना मुलावर अंत्यसंस्कार पार पाडले. हे जेव्हा त्याला कळलं तेव्हा तो आतून पार कोसळला आणि त्याच्या अश्रूंचा बांध फुटला…!

दिल्लीतून निघाल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी युपी गेटजवळच त्यांचा रस्ता अडवला. त्यामुळे पुढचे 3 दिवस गाझीपूरच्या उड्डानपुलाखालीच राम पुकारला रहावं लागलं. 3 दिवस तिथं काढल्यानंतर, काही अधिकाऱ्यांनी राम पुकारला दिल्लीच्या रेल्वे स्थानकावर नेऊन सोडलं. तिथून रामपुकार श्रमिक ट्रेनमधून बिहारमधल्या बेगुसरायला पोहचला. मात्र, अद्यापही आपल्या कुटुंबाला भेटण्याचा योग राम पुकारला आलेला नाही. ते एका शाळेत क्वारंटाईन झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-“मुंबईच्या आर्थिक नाड्या अजूनही परप्रांतीय हातात, शेठ मंडळींची जागा घेतली पाहिजे”

-माझा राजकीय वारसदार हा माझा कार्यकर्ता असेल, घरातील कुणी नाही- नितीन गडकरी

-पुण्यात दिवसेंदिवस वाढती रूग्णसंख्या; महापौरांनी केली अजित पवारांकडे ‘ही’ महत्त्वाची मागणी

-केंद्राने सावकाराचं काम करू नये; मजुरांना कर्जाची नाही तर पैशाची गरज आहे- राहुल गांधी

-10वी पास तरुणांना रेल्वेत सरकारी नोकरीची संधी; परीक्षेशिवाय 561 जागा भरणार