जप्त केलेल्या डायरीतून बाबा राम रहीम आणि हनीप्रीतबद्दल धक्कादायक खुलासा

बाबा राम रहीम आणि हनीप्रीत… बाबाला अटक झाली असली, शिक्षा सुनावण्यात आली, बाबा सध्या तुरुंगात शिक्षा भोगत असला आणि हनीप्रीतही कोठडीत असली तरी या दोघांनी अनेक अशी सत्य आहेत जी अद्याप बाहेर आलेली नाहीत. बाबा राम रहीमला न्यायालयाने 20 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. त्याची कथित शिष्या हनीप्रीतच्या डायरीमधून आता एक मोठा खुलासा झाला आहे. 11 महिन्यांच्या मोठ्या मेहनतीनंतर ही डायरी डिकोड करण्यात पोलिसांना यश आलं आहे. डायरी डिकोड झाल्यामुळे आता हनीप्रीतची चौकशी होणार आहे.

नेमकं काय आहे हनीप्रीतच्या डायरीत?

राम रहीमला शिक्षा झाल्यानंतर हनीप्रीत फरार झाली होती. ती जेव्हा पोलिसांच्या हाती लागली तेव्हा तिच्याकडून पोलिसांनी 2 डायऱ्या जप्त केल्या होत्या. त्यातील एक पॉकेट साईज डायरी डिकोड झाली आहे, मात्र दुसरी डायरी अजूनही डिकोड झालेली नाही. या डायऱ्यांमध्ये बाबा राम रहीम आणि हनीप्रीतच्या काळ्या पैशांची माहिती असू शकते, असा अंदाज आहे. 

राम रहीम आणि हनीप्रीतच्या सिक्रेट डायरीतून मोठा खुलासा

जमीन आणि पैसा किती?

केरळमध्ये राम रहीम आणि हनीप्रीतने मोठी जमीन खरेदी केली आहे. या जमिनीची किंमत कोट्यवधीच्या घरात आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील न्यूलँडच्या ऑरेंज काउंटीमध्ये देखील 10 एकर जमीन खरेदी करण्यात आलेली आहे. या जमिनीपैकी 8 एकर जमिनीवर बदामाची लागवड करण्यात आली आहे तर तब्बल 2 एकर जमीनवर अलिशान घर बांधण्यात आलेलं आहे. अमेरिकेत दोघांनी बँक खाती देखील आहेत.

कोणकोणत्या देशांमध्ये आहे संपत्ती?

बाबा राम रहीम आणि हनीप्रीत चांगलेच हुशार होते. बाहेरच्या देशांमध्ये त्यांनी त्यामुळेच जमीन खऱेदी केली. मात्र एकाच देशात नव्हे तर अनेक देशांमध्ये त्यांनी संपत्ती असल्याचं समोर आलं आहे. या देशांमध्ये अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, इटली, जर्मनी आणि न्यूझीलंड या देशांचा समावेश आहे.

Related image

भारतात आणखी कुठे कुठे आहे संपत्ती?

बाबा रहीम आणि हनीप्रीतकडे बक्कळ पैसा होता. या पैशाच्या जोरावर त्यांनी देशाच्या विविध भागांमध्ये स्वतःच्या नावाने संपत्ती घेतल्याचं समोर येतंय. राजस्थानमध्ये 30 एकर, हरियाणामध्ये 105 एकर, उत्तर प्रदेशमध्ये 15 एकर तर उत्तराखंडमध्ये 19 एकर जमीन दोघांनी खरेदी केलीय. अगदी काही काही वर्षांपूर्वींच ही खरेदी क करण्यात आलेली आहे. या जमिनींवर बागा तयार करण्यात आलेल्या आहेत. त्या बागेत मधोमध घर बांधण्यात आलेलं आहे. दोघे कधी या भागात असतील तर याच घरांमध्ये निवास करायचे.