“मी भाजपसोबत असताना भाजपला मनसेची गरज नाही”

सांगली | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्याचा मुद्दा कमालीचा उचलून धरला आहे. सध्या याचेच पडसाद संपर्ण देशभर पडताना दिसत आहेत.

शिवसेना, राष्ट्रवादीनं भोंग्याच्या मुद्द्यावरुन मनसेला चांगलंच घेरल्याचं पहायला मिळालं. फक्त सत्ताधारीच नाहीतर विरोधी पक्ष भाजपच्या काही नेत्यांनीही मनसेला लक्ष केल्याचं दिसत आहे.

मनसेसोबतच्या युतीविषयी सांगलीत बोलताना केंद्रीय सामाजिक न्यायंत्री रामदास आठवले यांनी खोचक वक्तव्य केलं आहे.

मनसेला सोबत घेण्याचा भाजपने विचार करू नये. मी सोबत असताना भाजपला मनसेची गरज नाही, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रामध्ये भाजप आणि आरपीआय सोबत  येत सत्ता आणूया आणि पुन्हा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याची आमची भूमिका आहे, असंही आठवले म्हणाले आहेत.

आठवले यांनी पुढे म्हटलं की, राज ठाकरेच्या मनसे बरोबर भाजपची युती करणं हे भाजपला परवडणार नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास, सबका विश्वास ही भूमिका मांडलीय, त्या भूमिकेला तडा जाऊ शकतो, त्यामुळे मनसेसोबत युती परवडणारी नाही, असं मत आठवले यांनी व्यक्त केलं आहे.

आठवलेंच्या या वक्तव्यावर आता मनसे काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  कोरोनामुळे देशात ‘इतक्या’ लाख लोकांचा मृत्यू, WHO च्या दाव्यानं खळबळ

  “राज ठाकरेंच्या मनसे बरोबर युती करणं भाजपला परवडणार नाही”

  “राज ठाकरेंना भाऊ मुख्यमंत्री झाल्यावरच भोंग्याचा त्रास सुरू झाला”

 भोंग्याच्या वादावर केंद्रीय मंत्र्याची राज ठाकरेंवर जोरदार टीका, म्हणाले…

मोठी बातमी! कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी अत्यंत महत्वाची माहिती समोर