अजित पवारांच्या राजीनाम्यावर रामदास आठवले म्हणतात…

पुणे : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शु्क्रवारी पुण्यातील पूरग्रस्त भागाचा पाहणी केली. टांगेवाले कॉलनी, अरणेश्वर, गजानन महाराज चौक, राजेंद्रनगर, आंबिल ओढा या भागाची पाहणी करून पूरगस्तांचे सांत्वन केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात येऊन पूरग्रस्तांची भेट घेऊन त्यांची विचारपूस करावी, असा सल्ला रामदास आठवले यांनी दिला आहे. त्यानंतर रामदास आठवले यांनी पत्रकार भवनात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आठवलेंनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या राजीनाम्यावर भाष्य केलं.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिला, याबाबत माहीत नाही, असं रामदास आठवले यांनी सांगितलं. मात्र अजित पवारांना भाजप किंवा रिपाइंमधून ऑफर नाही, असा टोलाही आठवलेंनी यावेळी लगावला आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे जाणते राजे आहेत. यांची ED चौकशी करणे योग्य नसल्याचं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. मात्र, यात सरकार सूडबुद्धीने वागत नाही, असं आठवलेंनी म्हटलं.

दरम्यान, भाजप-शिवसेनेत जागावाटपावरून अंतिम टप्प्यात चर्चा सुरू आहे. रिपाइंने 10 जागा मागितल्या आहेत. 9 मिळतील, असा विश्वास आठवलेंनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या-