मशिदिंवरील भोंगे हटवले तर आम्ही गप्प बसणार नाही; आठवलेंचा राज ठाकरेंना इशारा

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रीय एकात्मकतेला मारक अशी भूमिका घेऊ नये. मशिदींना हात लावल्यास आम्ही मुस्लिमांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मनसेला दिला आहे.

मशिदिंवरील भोंगे हटवण्याबाबत राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका अत्यंत चुकीची आहे. त्यामुळे मशिदिंवरील भोंगे हटवण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही त्याला विरोध करु, असं आठवले म्हणाले आहेत.  आठवले यांनी राज ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.

बांगलादेशी घुसखोरांना देशाबाहेर काढण्यासाठी मनसे मोर्चा काढणार आहे, तर दुसरीकडे नागरिकत्व सुधारणा कायद्याला त्यांचे समर्थन नाही. राज ठाकरेंही ही भूमिका दुटप्पी आहे, असं म्हणत त्यांनी टीका केली आहे.

चांगल्या कामांना पाठिंबा देण्याची भारतीय संस्कृती आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या चांगल्या निर्णयांना त्यांनी पाठिंबा द्यावा. त्यांनी सीएएला समर्थन द्यावे, असं आठवले म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-राज ठाकरेंच्या इंजिनाला भाजपचं इंधन?? राज आणि आशिष शेलार यांची तासभर चर्चा

-मुनगंटीवारांना हे शहाणपण आधी का सुचलं नाही?- नवाब मलिक

-फडणवीसांची घोषणा अन् ठाकरे सरकारची अंमलबजावणी; 70 हजार जागांची महाभरती

-ठाकरे सरकार 6 ते 8 महिन्यांपेक्षा जास्त चालणार नाही; या नेत्याचा घणाघात

-मी उद्धव ठाकरेंसोबत अयोध्येला जाणार… ते मंदिर बांधतील, मी मशीद बांधेन; आझमी पुत्राचा एल्गार