“काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दबावामुळेच शिवसेना भूमिका घ्यायला घाबरतीये- आठवले

पुणे | नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी मोहिमेबाबत शिवसेनेची भूमिका अत्यंत कलुषित झाली आहे. बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून लावणाऱ्या ‘सीएए’ ‘एनआरसी’चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समर्थन केलं पाहिजे, असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावामुळे शिवसेना भूमिका घेत नाही, असंही रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. आठवलेंनी यावेळी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.

बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका योग्य असून, ते सीएए, एनआरसीच्या पाठिंब्यासाठीच अप्रत्यक्षपणे मोर्चा काढत आहेत, अशा शब्दांत आठवलेंनी राज ठाकरेंचं अभिनंदन केलं आहे.

दरम्यान, सीएए आणि एनआरसीबाबत देशातील मुस्लिमांना भडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र हा कायदा नागरिकत्व देणारा असून, हिरावणारा नाही, असंही आठवलेंनी नमूद केलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-काँग्रेसने दिल्ली विधानसभेसाठी प्रदर्शित केलेल्या जाहिरनाम्यात केली ‘ही’ मोठी घोषणा

-पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी खास पथक; यावर्षीच्या बजेटमध्ये केली तब्बल 600 कोटींची तरतूद

-“शिवसेनेचे मंत्री कारकूना सारखे टेबलवरील पेन आणि फाईल उचलण्याचं काम करत असतात”

-नागरीकत्व सिद्धं करणं हे केवळ मुस्लिमांनाच नाही, तर हिंदूंनाही जड जाणार- उद्धव ठाकरे

-“उद्धव ठाकरेंना फिरायला वेळ आहे…… दखल घ्या नाहीतर मातोश्रीबाहेर आत्मदहन करू!”