“…म्हणून राज्यपालांनी शिवरायांविषयी केलेल्या वक्तव्यावर माफी मागण्याची गरज नाही”

पुणे | महाराष्ट्राचे दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना सोबत घेत चौफेर बाजूंनी शत्रू असताना एक स्वतंत्र राज्य स्थापन केलं. पण त्यांच्या पश्चात त्यांच्याबद्दल अनेक गोष्टींवरून वाद होताना राज्यानं पाहिले आहेत.

राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दोन दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांना समर्थ रामदास नसते तर कोण ओळखलं असतं, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

रामदास स्वामी हे शिवरायांचे गुरू होते त्यांच्या प्रेरणेनं शिवरायांनी स्वराज्य उभं केलं, असंही कोश्यारी म्हणाले आहेत. त्यानंतर राज्यात मोठा वाद उद्भवला आहे. विविध स्तरातून कोश्यारींवर टीका करण्यात येत आहे.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कोश्यारी यांच्या वक्तव्याची पाठराखण केली आहे. राज्यभरातून होत असलेली कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी ही चुकीचं असल्याचं मत आठवलेंनी व्यक्त केलं आहे.

राज्यपालांनी काय वक्तव्य केलं आहे ते तपासून पहायला हवं. समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू होते हे खरं आहे. राज्यपालांच्या वक्तव्यांचा विपर्यास करण्यात येवू नये, असं आठवले म्हणाले आहेत.

समर्थांनी शिवरायांना मार्गदर्शन केलं आहे. समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू होते त्यांच्या प्रेरणेनंच शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलं आहे, असं आठवले म्हणाले आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जागावाटपाबाबत देखील आठवलेंनी आपली भूमिका मांडली आहे. आम्हाला 39 जागा द्या बाकीच्या आपल्याकडं ठेवा, असं आठवलेंनी भाजपला म्हटलं आहे.

दरम्यान, आठवलेंनी राज्यापालांच्या वक्तव्याला समर्थन दिलं असल्यानं आता राज्यात मोठा वाद उद्भवला आहे. राज्यभरातून राज्यपालांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन केली जात आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

 मोठी बातमी! रशियाविरोधात अमेरिका आक्रमक; उचललं मोठं पाऊल

“चिखल फेकणाऱ्यांचे हात किती बरबटलेले, हे सुद्धा देशाला कळायला हवं” 

पुतिन यांचा अमेरिकेला झटका; घेतला हा मोठा निर्णय 

रशिया-यूक्रेन युद्धाचा मोठा फटका; सिलेंडर ‘इतक्या’ रूपयांनी महागला

‘…तर शुगर राहिल कंट्रोलमध्ये’; डायबिटीस पेशंटसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी