रामदास आठवलेंनी राज ठाकरेंच्या मास्क न घालण्यामागचे सांगितले कारण, म्हणाले…

सातारा |  काही महिन्यांपूर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला होता. मात्र पुन्हा कोरोना रोगाने डोकं वर काढायला सुरुवात केली आहे, याच पार्श्वभूमीवर सरकारने नागरिकांसाठी काही निर्बंध घालून दिले आहेत. तसेच कोरोनाचा संसर्ग कमी होण्यासाठी प्रशासनाने निमावलीही जाहीर केली आहे.

हे सगळ असताना काही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मास्क न घालता फिरताना दिसत आहेत. मंत्रालयात झालेल्या बैठकीत राज ठाकरे यांनी मास्क न घालताच उपस्थित राहिले होते. या मुद्यावरुन विरोधी पक्ष नेत्यांकडून राज ठाकरे यांच्यावर आ.रोप करण्यात येत आहेत. अशातच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांच्या मास्क न घालण्याचे कारण सांगितले आहे.

राज ठाकरे यांना कदाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदेश पाळायचा नसेल म्हणून ते मुद्दाम मास्क घालत नसतील, असं रामदास आठवले यांनी सांगितलं आहे. सातारा येथे रामदास आठवले यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना राज ठाकरेंच्या मास्क न घालण्याचा प्रश्न विचारण्यात आला होता.

तसेच राज ठाकरे यांनी सरकारने दिलेले आदेश पाळलेे पाहिजेत. नाहीतर राज्यात मास्क न वापरणाऱ्या सर्वसामान्य लोकांवर जशी कारवाई केली जाते. त्याच पद्धतीने नेत्यांवर देखील कारवाई झाली पाहिजे, असंही रामदास आठवले म्हणाले आहेत.

दरम्यान, मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला शिवाजी महाराज पार्क येथे मनसेकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळीही राज ठाकरे यांनी मास्क घातला नव्हता. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना मास्क न घालण्यावरुन प्रश्न विचारला असता,  मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतो, असं उत्तर त्यांनी दिलं होतं.

राज ठाकरे यांनी दिलेल्या आवाहनामुळे राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे, अशी त.क्रार अॅड. रत्नाकर चौरे यांनी राज ठाकरे यांच्या विरोधात क्रांती चौक पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. तसेच साथिच्या रोग प्रतिबंधात्मक कायद्याखाली राज ठाकरे यांच्यावर गु.न्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही अॅड. रत्नाकर चौरे केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

जागतिक महिला दिनानिमित्त गुगलकडून महिलांना ‘ही’ अनोखी भेट, पाहा व्हिडीओ

आज सोन्याच्या दरात इतक्या’ रुपयांची वाढ, पाहा काय आहेत दर

रोज गुळ खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे

“राज ठाकरेंच्या आवाहनामुळे राज्यातील कोरोना वाढला आहे”

ऑनलाईन सत्रादरम्यान वकिलाने जे केलं ते पाहून सॉलिसिटर जनरल म्हणाले आम्हालाही…