मुंबई | राज्याच्या राजकारणात सध्या विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वाद पेटला आहे. अशातच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एका सल्ला दिला आहे.
उद्धव ठाकरे चक्रव्युहात अडकले असून मी त्यांना काढण्याचा अनेकदा प्रयत्न केला मात्र ते बाहेर पडत नाहीत, असं रामदास आठवले म्हणाले आहेत.
ठाकरेंना माझा फक्त एक सल्ला आहे. तुम्ही त्या ठिकाणी सुखानं नांदा पण होवू देऊ नका वांदा, अशी मिश्किल टिप्पणी रामदास आठवलेंनी केली आहे.
आमचा पक्ष हा सर्वांना सोबत घेऊन जाणारा, वाद न निर्माण करणारा पक्ष आहे. राज्यात वाद होवू नयेत असंच मला वाटतं, असं रामदास आठवले म्हणाले आहेत.
मी ज्या पक्षासोबत राहातो त्यांची सत्ता येते. शिवसेनेनं जनमताचा अनादर करून सत्ता स्थापन केली आहे, अशी टीकाही यावेळी रामदास आठवलेेेंनी केली आहे.
विनाकारण सामाजिक द्वेष निर्माण करू नका, भोंगे काढण्याची भाषा करू नका, भोंगा आवडत नसेल तर ऐकू नका, असा सल्ला रामदास आठवलेंनी राज ठाकरेंना दिला आहे.
दरम्यान, राज ठाकरेंनी भोंग्याबाबत आक्रमक भूमिका घेतल्यानंतर राज्यात मोठा वाद निर्माण झालाय. रामदास आठवलेंनी देखील याबाबत राज ठाकरेंच्या विरूद्ध भूमिका घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘बहुजनांना तुमच्यासारखा काकांचा हुजऱ्या समजू नका’; पडळकरांंचा हल्लाबोल
“गुन्हे आणि आरोप फक्त आमच्यावर सिद्ध होतात, इतरांवर ते का सिद्ध होत नाहीत?”
कंटेनरची रिक्षाला जोरदार धडक, भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू
Stock Market: शेअर मार्केटमध्ये घसरण, गुंतवणूकदारांना मोठा झटका