पुणे | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या निकटवर्तीयांच्या कंपन्यावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. यावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आयकर विभागाच्या या छाप्प्यांनी अजित पवार यांना फारसा फरक पडणार नाही, असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.
ईडी, सीबीआय आणि इतर काही संस्था केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्या तरी अजित पवार यांच्या कुटुंबियांवर पडलेल्या छापेमारीमध्ये केंद्र सरकारचा किंवा भाजपचा कसलाही हस्तक्षेप नाही. या यंत्रणा स्वतंत्र असल्याचं मत आठवले यांनी व्यक्त केलं आहे. पण त्याच वेळी या छाप्यांनी अजित पवार यांना फारसा फरक पडणार नाही, असं रामदास आठवले म्हणालेत.
आर्यन खानवर एनसीबीने केलेली कारवाई योग्य असून नवाब मलिक चुकीचे आरोप करत असल्याचं रामदास आठवलेंनी म्हटलंय.
दरम्यान, राज्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी 50 हजारांची नुकसानभरपाई द्यावी, असंही रामदास आठवले म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या-
‘माझ्या मृत्यूपत्रात नितीन गडकरींचं नाव’; ‘या’ नेत्याने उघड केलं गुपित
देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील डाव त्यांच्यावरच उलटेल- छगन भुजबळ
‘आवाज कमी ठेवा, बोट दाखवायचं नाही’; यशोमती ठाकूर अन् रवी राणांमध्ये खडाजंगी
राज्यात आणि देशात काँग्रेस हाच सक्षम पर्याय आहे- नाना पटोले
“आर आर आबांनी मला त्याचवेळी सांगितलं होतं, गृहमंत्री झाल्यावर…”