गांजा ओढणाऱ्या बाबांनाही तुरूंगात टाका- रामदास आठवले

मुंबई | मुंबई ड्रग्स प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. या प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. आता या प्रकरणावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कायद्यामुळे सगळे समान असतात. मग तो शाहरूख खानचा मुलगा आर्यन असो की कुंभमेळ्यात गांजा ओढणारे भोंदू बाबा. त्या सर्वांवर कारवाई होणं गरजेचं आहे, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

एनसीबी अधिकारी दलित असल्यामुळे मंत्री नवाब मलिक त्यांना लक्ष्य करत असल्याचं रामदास आठवलेंनी म्हटलं आहे. स्वत: च्या जावयाला ड्रग प्रकरणी अटक केल्यामुळे खवळलेल्या नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंना बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं आहे, अशी टीका रामदास आठवलेंनी केली आहे.

एनसीबीला पाच ग्रॅम ड्रग्जची माहिती मिळू शकते मग सर्रास गांजा, ड्रग्ज ओढणारे बाबा का दिसत ना? यावर सगळ्यांनाच समान न्याय हवा. नशा करणाऱ्या भोंदू बाबांनाही कायद्यानुसार तुरुंगात डांबावे आणि सामाजिक न्याय विभागाच्या भूमिकेनुसार त्यांना व्यसनमुक्ती केंद्रात भरती करावं, असं रामदास आठवले म्हणाले.

दरम्यान, नवाब मलिकांनी केलेल्या आरोपांनंतर समीर वानखेडेंवर कारवाई होण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. अशात समीर वानखेडेंवर एफआयआर दाखल होणार का? असा थेट सवाल मलिक यांना करण्यात आला. त्यावर मलिक यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली. एफआयआर घटनेबाबत होईल. खंडणी वसूल करणे, पंच फरार असताना आरोपींना हँडल करणे, कोऱ्या कागदावर सह्या घेणे आदी गोष्टींचा तपास होईल आणि त्यानंतर पोलीस एफआयर दाखर करतील. एफआयआर व्यक्ती विरोधात होणार नाही. घटनेचा असेल. तपासात जेजे जबाबदार असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊन कारवाई होईल. कुणाला सूडबुद्धीने अडकवायचं नाही, असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

धक्कादायक! स्टेजवर बोलत असतानाच काँग्रेस नेत्याचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

‘तुम्ही करा रे कितीही हल्ला, लय मजबूत भिमाचा किल्ला’; चित्रा वाघ यांचं मलिकांना प्रत्युत्तर

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये ‘इतक्या’ रूपयांची वाढ, वाचा आजचा दर

“नवाब मलिकांचं दुःख वेगळं आहे, ते स्पष्टपणे समोर येतय”

“शिवसेनेचा इतिहास पाहा, नाव महाराजांचं घेतील पण काम मुघलांचं करतील”