नाशिक | काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्तेबाहेर काढण्यासाठी भाजपने मन मोठं करुन शिवसेनेला पाच वर्ष मुख्यमंत्रिपदाची ऑफर द्यावी, असा सल्ला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मित्रपक्ष भाजपला दिला आहे.
भाजपला सल्ला देत रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा ऑफर दिली आहे. रामदास आठवले नाशिकच्या दौऱ्यावर आहे.
आज आयोजित पत्रकार परिषदेत बोलत असताना आठवले यांनी भाजपचीच समजूत काढण्याचा प्रयत्न केला. या वेळी दोन्ही पक्षांनी पुन्हा युती करावी, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
भाजपला विश्वास होता, काँग्रेस पाठिंबा देणार नाही आणि त्यांचा तो अंदाज चुकला आणि सेनेने दोन्ही काँग्रेससोबत जात सत्ता स्थापन केली. पण सेनेला पाच वर्ष मुख्यमंत्रिपद दिल्यास ते युती करतील. पण भाजप हा सल्ला ऐकेल की नाही यावर आठवलेंनी भाष्य केलं नाही.
निवडणूक प्रचारात देशात नरेंद्र व राज्यात देवेंद्र असा भाजपचा प्रचार होता. पण तेव्हा सेनेने आक्षेप घेतला नाही. पण निकालानंतर आकडे आले तेव्हा आपल्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही हे लक्षात आल्यावर सेनेने मुख्यमंत्रिपदासाठी हट्ट धरला. तेव्हा सेनेचा अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचा फार्म्युला भाजपने फेटाळला, असंही रामदास आठवले म्हणाले आहेत.
दरम्यान, उद्धव ठाकरे आणि आमचे घराचे संबध आहे. भीम शक्ती व शिव शक्ती एकत्र आली होती. उद्धव ठाकरे यांनी लवकर बरे होऊन कोरोना विरोधात दंड थोपटावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात युतीच्या चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळतंय.
नितीन गडकरी यांनी राज्यात लक्ष घातलं तर शिवसेना भाजप एकत्र येईल. शिवसेना-भाजप यांना एकत्र आणण्याची चावी गडकरी यांच्याकडे आहे, असं मंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या
राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत अचानक घट, मात्र धोका कायम; वाचा आजची ताजी आकडेवारी
सुशिक्षित शेतकऱ्याची यशोगाथा! पेरूच्या उत्पादनातून कमावले लाखो रूपये
48 चा झाला बड्डे बाॅय ऋतिक, जाणून घ्या पिळदार शरीराचं सिक्रेट
कपिल शर्माची नरेंद्र मोदींच्या अंदाजात काॅमेडी म्हणाला, “मित्रो आज रात्री…”
राहुल गांधींनी उलटच केलं! पक्षातील ‘ही’ परंपरा मोडण्यासाठी घेतला मोठा निर्णय