‘शिवसेना फोडण्यामागे शरद पवार नाही, तर…’; ‘या’ केंद्रीय मंत्र्याचं मोठं वक्तव्य

मुंबई | शिवसेना नेते दिपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आरोप केले होते. शरद पवारांनी शिवसेना फोडली असं केसरकर म्हणाले होते. आता यावर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी भाष्य केलं आहे.

रामदास आठवलेंनी संजय राऊत यांनी पक्षात फूट पाडल्याचा आरोप केला आहे. शरद पवारांनी नाही तर संजय राऊतांनीच शिवसेना फोडली असल्याचा आरोप आठवलेंनी केला आहे.

उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या सांगण्यावरुन राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत युती केली असल्याची टीकाही रामदास आठवलेंनी केली आहे.

दरम्यान, अनेक नेत्यांनी राष्ट्रवादीवर आरोप करत शिवसेनेला रामराम केला आहे. नुकतंच रामदास कदम यांनी शरद पवारांनी शिवसेना फोडल्याचा आरोप केला होता. पवारांनी पद्धतशीरपणे शिवसेना पक्ष कमकुवत केला असल्याची टीकाही कदमांनी केली होती.

उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मंत्र्यांसोबत बसावे, हे आम्हाला कोणालाच मान्य नव्हते. एकनाथ शिंदे यांनी हे पाऊल उचलले नसते तर शिवसेनेकडे 10 आमदारही शिल्लक राहिले नसते, असंही कदम म्हणाले होते.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या सत्तानाट्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात प्रचंड उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळालं आहे

महत्त्वाच्या बातम्या-

“शिंदे-फडणवीसांचं सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच” 

“एकनाथ शिंदेंनी निवडणूक लढवली तर बापाचं नाव लावणार नाही”

आदित्य ठाकरेंचा भर पावसात कार्यकर्त्यांशी संवाद, शरद पवारांच्या ‘त्या’ सभेची करून दिली आठवण

हॉटेलमधील ‘तो’ व्हिडीओ शेअर करताच नाना पटोले चित्रा वाघ यांच्यावर बरसले, म्हणाले…

पंधरा वर्षांपूर्वीही आजच देशाला मिळाल्या होत्या पहिल्या महिला राष्ट्रपती, मुर्मू इतिहासाची पुनरावृत्ती करणार?,