मुंबई | ‘कोरोना’च्या प्रसाराचा जगाला धोका पोहोचू नये, यासाठीत चीनने कोणतीही खबरदारी घेतली नाही. त्यामुळे चीनवर जगाने बहिष्कार घालून धडा शिकवला पाहिजे, अशी मागणी रिपाइं अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
चीनने कोरोना महामारीबद्दल जगाला अनभिज्ञ ठेऊन धोका दिला. कोरोना साथीचा संसर्ग जगभर वाढण्यास चीन जबाबदार आहे. चीनमधील आंतरराष्ट्रीय विमान उड्डाण योग्य वेळी बंद करायला हवे होतं, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
कोरोनाच्या प्रसाराचा जगाला धोका होऊ नये, याबाबत चीनने कोणतीही खबरदारी घेतली नाही. त्यामुळे जगाने चीनवर बहिष्कार घालून धडा शिकवला पाहिजे, असं मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. तसेच जगावर कोरोनाचं संकट लादण्यास सर्वथा चीन जबाबदार असल्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाने चीनवर बहिष्कार घातला पाहिजे, असंही आठवलेंनी म्हटलंय.
कोरोनाच्या महामारीमुळे आजवर संपूर्ण जगात 3 लाखांहून अधिक लोकांचे बळी गेले आहेत. पहिल्या-दुसऱ्या महायुद्धानंतर आता कोरोनाचे तिसरे जागतिक महायुद्ध सुरु आहे. यात जगातील 190 देश भरडले जात आहेत, असं आठवले म्हणाले.
विश्वमे 3 लाख से भी अधिक लोगोंकी मृत्यू कोरोना महामारी से हुई है इस महामारी के लिये चीन जिम्मेदार है! चिनको सबक सिखाने के लिये चीन के उत्पादन पर बहिष्कार डालना चाहीये! pic.twitter.com/AkERA5DoD6
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) May 20, 2020
महत्वाच्या बातम्या-
-झेपत नाहीये हे कबूल करण्याचा प्रमाणिकपणा नाही; भाजपचा जयंत पाटलांना टोला
-रामजन्मभूमीचं सपाटीकरण करत असताना सापडल्या प्राचीन मूर्ती-शिवलिंग; वाचा संपूर्ण प्रकार
-महिला पोलिसानं केलेलं ‘हे’ कौतुकास्पद काम पाहून तुम्हीही त्यांना सलाम ठोकाल!
-उद्धव ठाकरेंचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना दणका, उचललं ‘हे’ पाऊल
-“नरेंद्र मोदींमुळेच कोरोना भारतात आला, त्यांच्यावर 302 चा गुन्हा दाखल करा”