महाराष्ट्र मुंबई

भाजपने विधानपरिषदेची जागा न दिल्याने रामदास आठवले नाराज!

मुंबई | भाजपने रिपाइंला विधानपरिषदेची एक जागा न दिल्याने केंद्रिय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले हे नाराज आहेत. त्यांनी यासंदर्भात ट्विट करून आपली नाराजी व्यक्त केली आहे.

गेली अनेक वर्ष रिपाइं भाजपसोबत ताकदीने उभा आहे. तसंच निवडणुकीत रिपाइं आणि दलित समाज भाजपबरोबर असून देखील भाजपने रिपाइंवर अन्याय केला आहे, अशी भावना कार्यकर्त्यांची असल्याचं आठवले यांनी सांगितलं आहे.

रामदास आठवले यांनी विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपकडे एका जागेची मागणी केली होती. मात्र काल भाजपने काल विधानपरिषद निवडणुकीसाठी आपले चार उमेदवार घोषित केले. यामध्ये रिपाइंला जागा सोडण्यात आलेली नाहीये.

दरम्यान, भाजपने गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके, रणजितसिंह मोहिते पाटील आणि डॉ. अजित छोपछडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली आहे. काल दुपारी या नावांची घोषणा झालेली आहे.

रामदास आठवले यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय, “महाराष्ट्रात 21 मे रोजी विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक होत असून त्यातील 1 जागा भाजप ने रिपब्लिकन पक्षाला द्यावी अशी रिपाइं ची मागणी होती. मित्रपक्ष म्हणून भाजप च्या वाट्याला येणाऱ्या 4 जागांपैकी 1 जागा रिपाइं ला न सोडल्याने रिपाइं कार्यकर्ते नाराज आहेत”.

 

महत्वाच्या बातम्या-

-रेल्वेखाली चिरडून मरण पावलेले कोरोना आणि लॉकडाऊनचे बळी- संजय राऊत

-आयटी कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर कुऱ्हाड, ‘या’ छुप्या पद्धतीनं काढून टाकलं जातंय

-“मजुरांच्या गाड्यांना बंगालमध्ये प्रवेश न देणं हे माणुसकीला धरून नाही”

-आज फिर हमने दिल को समझाया; दुखा:त बुडालेल्या मेधा कुलकर्णींचं ट्विट

-‘अरे वाघांनो असं रडताय काय मी आहे ना…’ दुखावलेल्या कार्यकर्त्यांची पंकजांनी घातली समजूत