मशिदींना हात लावल्यास मी मुस्लिमांच्या पाठीशी उभा राहील- आठवले

मुंबई | मुंबईतल्या गोरेगावच्या नेस्को मैदानात मनसेने महाअधिवेशन घेऊन इथून पुढच्या राजकारणाची दिशा स्पष्ट केली. हिंदुत्व कधीही सोडलेलं नव्हतं म्हणत मशीदीवर इथून पुढे भोंगे चालणार नाहीत, असं म्हणत राज यांनी मुस्लिमांना एकप्रकारे इशाराच दिला. आता राज यांच्या भूमिकेवर केंद्रिय सामाजिक न्यायविकास मंत्री रामदास आठवले यांनी टीका केली आहे. मशिदींना हात लावल्यास मी मुस्लिमांच्या पाठीशी उभा राहील, असं आठवले म्हणाले आहेत.

मशीदीवरील भोंगे काढण्याबाबत राज यांची भूमिका चुकीची आहे. भारतीय एकात्मतेविरोधी कुणीही भूमिका घेऊ नये. पण राज यांनी जर मुस्लिमांच्या विरोधी भूमिका घेतली तर माझा रिपब्लिकन पक्ष मुस्लिमांच्या बाजूने उभा राहिल, असं आठवले म्हणाले.

बांगलादेशी, पाकिस्तानी आणि अफगाणिस्तानी मुसलमान घुसखोरी करून देशात राहू शकत नाही. राज यांनी मुस्लिमांबाबत घेतलेली भूमिका चुकीची असल्याचं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलंय.

येत्या 9 मार्च रोजी मुंबईतल्या मुस्लिमबहुल भागातून NRC ला पाठिंबा दर्शवण्यासाठी राज ठाकरे मोर्चा काढणार आहे. आता आठवले यांनी घेततेल्या भूमिकेवर मनसे त्यांना काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-“इस्रोनं जरी मदत केली तरी ‘राहुल’ नावाचं सॅटेलाईट लाँच होणार नाही”

-….याप्रकरणी भाजप राधाकृष्ण विखे पाटलांची चौकशी करणार!

-रोहित शर्माच्या मॅचविनिंग खेळीला दिग्गज क्रिकेटपटूंचा सॅल्यूट!

-जन्मठेपेच्या शिक्षेला आव्हान देत अरूण गवळीची सर्वोच्च न्यायालयात धडक

-पुरोगामी चळवळीचा आधारवड हरपला; ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ काळाच्या पडद्याआड