“राज ठाकरेंना कोणताच उद्योगधंदा नाही”

पुणे : राज ठाकरेंना कोणताच उद्योगधंदा नाही. त्यामुळं ते ईव्हीएमच्या विरोधात बोलत आहेत, असं म्हणत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

ईव्हीएम प्रश्नाबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भेटून काय होणार आहे? असा सवालही यावेळी आठवलेंनी उपस्थित केला आहे.

राज ठाकरेंनी ईव्हीएमवर आक्षेप घेण्यापेक्षा आपला पक्ष वाढवण्यावर लक्ष द्यावे, असा सल्लाही आठवलेंनी राज ठाकरेंना दिला आहे. पुण्यातील नविन विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

विरोध आता गलितगात्र झाले आहेत. त्यामुळे ते आता ईव्हीएमला पुढे करत सरकारवर निशाणा साधत आहेत. काँग्रेसने तेव्हा बोगस मतदान केले होते. म्हणून ईव्हीएम समोर आणलं. आता मोदींना मत मिळत आहे म्हणून त्यावर आक्षेप घेतला जात आहे, असा आरोप आठवलेंनी केला आहे. 

लोकांमध्ये मोदींबद्दल लोकांच्या मनात चांगली भावना आहे. म्हणून त्यांचं बोट आपोआप कमळाच्या बटणाकडे जातं. राष्ट्रवादीचं घड्याळ दहा दहाच्या पुढे जात नाही आणि काँग्रेसचा हात चालत नाही, असं म्हणत आठवलेंनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवरही निशाणा साधला आहे.

मोदी उस्तादांचा उस्ताद आहे. जाती धर्माच्या पलिकडे गेलेला माणूस आहे. आमची मतपत्रिकेवर निवडणूक लढण्याची तयारी आहे. तरीही मोदी जिंकले तर मतदान केंद्र ताब्यात घेतले, अधिकाऱ्यांनी शिक्के मारले, असं म्हणत आठवलेंनी विरोधकांना टोलाही लगावला आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-“राष्ट्रवादीला लागलेल्या गळतीमुळे शरद पवार जखमी”

-“काट्याने काटा काढायला आम्ही काय मेलेल्या आईचं दुध पिलंय का?”

-मुख्यमंत्री म्हणतात….युतीचा ‘फिफ्टी-फिफ्टी’ फार्मुला जरा वेगळाच!

-उपमुख्यमंत्रीपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट!