“बहुमत सिद्ध करण्यासाठी आणखी वेळ मिळाला असता तर फडणवीसांना राजिनामा द्यावा लागला नसता”

मुंबई | सर्वोच्च न्यायालयाने बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपला 24 तास एवढा कमी कालावधी दिला नसता तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना राजीनामा द्यावा लागला नसता, असं वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे.

भाजप बहुमत दाखवून सत्ता स्थापन करु शकला असता मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेला कालावधी हा खूप कमी होता. इतक्या कमी वेळात सत्तास्थापन करणे अवघड असते. त्यामुळे फडणवीस आणि पवारांना राजीनामा द्यावा लागला, असं आठवले म्हणाले आहेत.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होईल अशी शक्यता निर्माण झाली असताना अजित पवारांनी अनपेक्षितपणे भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या शपथविधीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेली होती. यावेळी भाजपनं 30 तासांमध्ये त्यांचे बहुमत सिद्ध करावे, असे आदेश न्यायालयाने दिले होते. बहुमत सिद्ध करण्यास असमर्थ असल्याने फडणवीसांनी वेळेपूर्वीच राजीनामा दिला होता.

 

महत्त्वाच्या बातम्या-