“पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संकल्प पुर्ण करुया, भारताला कोरोनापोसून वाचवूया”

मुंबई | गर्दीमुळे करोनाचा संसर्ग वेगानं वाढत असल्यानं केंद्राबरोबर राज्यातील सरकारांकडून लोकांना बाहेर न पडण्याचं आवाहन केलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधताना आज जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलं आहे. यादरम्यान आज घरी बसल्यावर काय करणार?, याबाबत रामदेव बाबांनी एक सल्ला दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र यांचा संकल्प आपण सारे पूर्ण करून दाखवूया. भारताला करोनापासून वाचवूया. सर्वांनी घरी स्वाध्याय करा. योग करा. काही आसनं करा. प्राणायाम आणि ध्यानधारणा करा, असा सल्ला रामदेव बाबांनी नागरिकांना दिला आहे.

घरी बसल्या बसल्या सत्संगही करा आणि कोणीही बाहेर येऊ नका घरातच राहा, असं आवाहनही बाबांनी सर्वांना केलं आहे.

दरम्यान, जनता कर्फ्यू सुरू होत आहे. मी विनंती करतो की, सर्व नागरिकांनी या देशव्यापी अभियानात सहभागी होऊन करोनाविरोधातील ही लढाई यशस्वी करावी. आपला संयम आणि निर्धार या आजाराला पराभूत केल्याशिवाय राहणार नाही, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. सकाळी पहाटे याबाबतचं ट्विट मोदींनी केलं.

 

महत्वाच्या बातम्या – 

-“विराट इतर खेळाडूंसारखा नौटंकी करत नाही, क्रिकेटप्रती त्याला आदर आहे”

-“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे ‘जनता कर्फ्यूचं’ आवाहन केलं आहे त्याला सगळ्यांनी 100 टक्के प्रतिसाद द्या”

-कोरोनाची लागण झाली कनिकाला, पण चिंता वाढली नेतेमंडळींची!

-पार्थ पवार सिंगापूरहून आले का?; अजित पवारांचं ‘दादा’ शैलीत उत्तर!

-राज्य सरकारच्या सर्व सूचनांचे नागरिकांनी तंतोतंत पालन करा- देवेंद्र फडणवीस