देश

रामदेवबाबा म्हणतात, मोदी सत्तेत येतील की नाही सांगता येत नाही!

नवी दिल्ली : बाबा रामदेव हे योग दुनियेतील मोठं नाव आहे. भाजप तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती करणाऱ्या रामदेव बाबा यांनी हवा बघून आता वक्तव्य करण्यास सुरुवात केली आहे. बाबा रामदेव यांनी मदुराईमध्ये केलेल्या एका वक्तव्याची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. 

बाबा रामदेव नेमकं काय म्हणाले?-

योगगुरू बाबा रामदेव यांनी आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने एक अतिशय महत्वाचं वक्तव्य केलं आहे. सध्याची राजकीय परिस्थिती कठीण आहे. पुढील पंतप्रधान कोण असेल, हे मी आत्ताच सांगू शकत नाही, असं बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे.

हिंदू भारत करण्याचा उद्देश नाही-

मी माझं लक्ष राजकारणावर केंद्रीत केलं नाही. मी कुणाचंही समर्थन किंवा विरोधही करत नाही, तसेच जातीय किंवा हिंदू भारत करण्याचा माझा कोणताही उद्देश नाही, असं बाबा रामदेव यांनी परखडपणे सांगितलं आहे.

आम्हाला भारतासह हे जग अध्यात्मिक करायचे आहे, असं बाबा रामदेव यावेळी म्हणाले.

नसिरुद्दीन शहांना सल्ला-

नसिरुद्दीन शहा यांनी केलेल्या वक्तव्यावर देखील बाबा रामदेव यांनी प्रतिक्रिया दिली होती.

भारतामध्ये सहिष्णुता आहे, तितकी जगातील कोणत्याच देशात नाही. नसिरुद्दीन शहा यांनी जग फिरावं, असा सल्ला बाबा रामदेव यांनी दिला आहे.

हनुमानाची जात शोधणाऱ्यांचा समाचार-

गेल्या काही दिवसांमध्ये हनुमानाच्या जातीवरुन दावे करणाऱ्या नेत्यांचं प्रमाण वाढलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मनुष्यबळ विकास राज्य मंत्री सत्यपाल सिंग यांनी देखील याबद्दल वक्तव्ये केली होती. अशा नेत्यांचा बाबा रामदेव यांनी खरपूस शब्दात समाचार घेतला होता.

वैदिक काळामध्ये जन्माच्या आधारावर जातिव्यवस्था अस्तित्वात नव्हती. हनुमानाचा संबंध एखाद्या जातीशी जोडणं हा आपल्या देवतांचा अवमान आहे, असं बाबा रामदेव यावेळी बोलताना म्हणाले. 

IMPIMP