भाजपने ऐनवेळी उमेदवार बदलला; पंकजा मुंडेंच्या ‘या’ कट्टर समर्थकला विधानपरिषदेची उमेदवारी

मुंबई | भाजपने ऐनवेळी विधानपरिषदेचा उमेदवार बदलला आहे. भाजपने डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगून, पंकजा मुंडेंचे कट्टर समर्थक रमेश कराड यांना उमेदवारी दिली आहे. गोपछडे यांनी 8 मे रोजी आपला अर्ज भरला होता, तर काल शेवटच्या दिवशी रमेश कराड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

भाजपने 8 तारखेला अजित गोपछडे यांच्यासह माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके यांचे उमेदवारी अर्ज भरले होते. त्याशिवाय डमी अर्ज म्हणून रमेश कराड आणि संदीप लेले यांना अर्ज भरण्यास सांगितलं.

रमेश कराड हे पंकजा मुंडे यांच्या अत्यंत जवळचे असल्याचं सांगण्यात येत आहे. कराड यांनी दोन वर्षापूर्वीही विधानपरिषद निवडणुकीत मोठी खेळी केली होती. त्यावेळी त्यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश करुन विधानपरिषदेचं तिकीट मिळवलं होतं. मात्र अवघ्या पाच दिवसात त्यांनी माघार घेत पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला होता.

दरम्यान, ऐनवेळी भाजपने रमेश कराड यांना मैदानात उतरवलं आहे. रमेश कराड हे पंकजा मुंडे यांचे समर्थक आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-कौतुकास्पद! कर्ज काढून ‘या’ अभिनेत्याने कर्मचाऱ्यांना दिला पुढील सहा महिन्यांचा पगार

-लॉकडाउनमध्ये महाराष्ट्र पोलिसांनी वसूल केला ‘इतक्या’ कोटींचा दंड

-कर्ज फेडण्यासाठी अनिल अंबानी यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

-मुंबई-पुण्यातून रेल्वे कुठे आणि कधी सुटणार?; वाचा संपूर्ण माहिती

-“कोरोनामुक्ती लढ्यातील परिचारिकांच्या सेवेची मानवतेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल”