कहरच! PUBG खेळण्यासाठी चिमुकल्यानं पोलिसांना पळवलं; किस्सा वाचून तुम्हीही पोट धरून हसाल

मुंबई | आजकाल मोबाईल हा जीवनचा अविभाज्य घटक बनला आहे. बोलताना, चालताना, प्रवास करताना कोणाच्या हातात मोबाईल नसेल असं क्विचितच पहायला मिळतं.

लहान मुलं देखील मोबाईलसाठी भोकाड पसरल्याचं पहायला मिळतं. लहान मुलं हट्टाला पेटल्याने आई वडिल देखील मुलांना सहन फोन वापरून देतात. त्यामुळे त्यांच्या बालमनावर परिणाम होण्याची शक्यता असते.

मागील काही वर्षांपासून लहानमुलांमध्ये गेमिंगच्या आहारी जाण्याचे प्रकार वाढत आहेत. पब्जी या गेममुळे लहान मुलांना तर याडच लागलंय. असाच काहीसा प्रकार पहायला मिळाला आहे.

कर्नाटकातील बंगळुरूच्या यलहंका रेल्वे स्टेशनवर असलेल्या हेल्पलाईन नंबरवर एक काॅल आला. त्यावेळी धावत्या रेल्वेमध्ये बॉम्ब असल्याची माहिती देणारा हा काॅल होता. त्यावेळी पोलिसांची एकच तारंबळ उडाली. पोलिसांची धावपळ झाली.

अनेक ठिकाणी शोधाशोध केल्यानंतर कुठंच काही पोलिसांना सापडलं नाही. जवळजवळ दीड तास पोलीस बाॅम्ब शोधत होते. त्यानंतर पोलिसांनी फोन करणाऱ्यांचा शोध घेतला. हा विनायक नगरमधील एका किराणा दुकानातून करण्यात आला होता.

माहिती काढल्यानंतर कळालं की, एका 12 वर्षाच्या लहान मुलाने हा काॅल केला होता. कारण होतं PUBG. तो आणि त्याचा पब्जी पर्टनर गेम खेळत होते. त्यावेळी त्याच्या पर्टनर ट्रेनमधून प्रवास करत होता. त्याला पब्जी खेळण्यासाठी नेटवर्क नसल्याने लहान मुलाने हा बाॅब्म असल्याचा फोन केला होता.

दरम्यान, पोलिसांनी कारवाई न करता वाॅर्निंग देऊन सोडून दिलं. 2 वाजता थांबलेली ट्रेन संध्याकाळी पावणे पाचच्या सुमारास पुन्हा धावू लागली.

महत्त्वाच्या बातम्या – 

OnePlus चाहत्यांसाठी खुशखबर; पहिल्याच दिवशी मिळवा ‘इतक्या’ हजारांचा बंपर डिस्काऊंट

 Sanjay Raut: “आम्ही तुम्हाला फाट्यावर मारतो”; संजय राऊत कडाडले

 ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

  “पैसे जपून खर्च करा, चिकन खरेदी करायला गेलात तरी भाजप ईडीला कळवेल”

  लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती आली समोर, रेल्वेनं घेतला मोठा निर्णय