नवी दिल्ली | काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी रस्त्यांवर पायी चालणाऱ्या स्थलांतरित मजुरांजवळ जावून ड्रामेबाजी करत आहेत, अशी टीका सीतारमन यांनी केली. त्यांच्या याच टीकेवरून काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सीतारमन यांच्यावर निशाणा साधला.
मूकबधिर सरकारला मजुरांच्या समस्येबाबत जागरुत करणं अपराध असेल तर काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी वारंवार तो अपराध करतील. आम्ही मोदींसारखे ड्रामेबाज तर नाहीत, त्यांना जेव्हा मत हवं असतं तेव्हा ते मजुरांचे पाय धुतात, अशी टीका रणदीप सुरजेवाला यांनी केली.
राहुल गांधी मजुरांचं दु:ख वाटण्यासाठी त्यांच्याजवळ गेले होते. दु:ख वाटणं हा अपराध असेल तर हा अपराध आम्ही वारंवार करु, असं सुरजेवाला यांनी म्हटलंय.
दरम्यान, स्थलांतरित मजुरांना दिलासा देण्याऐवजी जखमेवर मीठ चोळणं बंद करावं. ते मजूर आहेत, मजबूर नाहीत. श्रमिक आणि कामगारांचा अपमान करु नका. हा देश तुम्हाला माफ करणार नाही, अशा शब्दांत सुरजेवाला यांनी भाजपवर टीकास्त्र सो़डलंय.
मोदीजी-निर्मलाजी,
राहत के मलहम की बजाय घाव पर नमक छिड़कना बंद करें। ये मज़दूर है,मजबूर नही।
मज़दूर की बेबसी आपको ड्रामेबाज़ी लगती है?
नंगे पाँव में पड़े सैंकड़ों छाले ड्रामेबाज़ी दिखते हैं?
भूखे प्यासे चलते जाने की व्यथा ड्रामेबाज़ी है?सवेंदनहीन सरकार मज़दूरों से माफ़ी माँगे। pic.twitter.com/WyEJ7T5WRf
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) May 17, 2020
महत्वाच्या बातम्या-
-केंद्राने जाहीर केलेले पॅकेज म्हणजे ‘खोदा पहाड, निकला जुमला’; अशोक चव्हाणांची सडकून टीका
-उद्धवा अजब तुझे सरकार, गजब तुझा कारभार; सोमय्यांचा पुन्हा राज्य सरकारवर निशाणा
-सिलेंडर संपल्याने अंध दाम्पत्याची उपासमार; पोलिसांनी दिला मदतीचा हात
-अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचा ‘तो’ दावा खोटा- अनिल देशमुख
-“सरकारच्या कामावर शरद पवार समाधानी, राज्य सावरण्यासाठी त्यांची धडपड अद्भुत”