रणधीर कपूर यांनी चुकून शेअर केला करिनाच्या दुसऱ्या मुलाचा फोटो, पाहा कसा दिसतो चिमुकला

मुंबई| बॉलिवूड स्टार जोडी करीना कपूर खान आणि सैफ अली खान नेहमी चर्चेत असलेले पहायला मिळतात. करीना कपूर खानने दुसऱ्यांदा मुलाला जन्म दिला आहे. यापूर्वी करीनाला तैमूर आली खान नावाचा एक मुलगा आहे. करीनाने आतापर्यंत आपल्या धाकट्या मुलाला मीडियापासून पूर्णपणे दूर ठेवले होते.

जेव्हापासून करिना कपूर खानने दुसर्‍या मुलाला जन्म दिला आहे तेव्हापासूनच तिला सतत अभिनंदन मिळत आहेत. तैमूरच्या धाकट्या भावाची झलक पाहायला सर्व जण उत्सुक आहेत. जरी काही फोटोंमध्ये नवजात बाळाची झलक दिसली आहे, परंतु अद्याप कोणीही त्या मुलाचा चेहरा पाहिलेला नाही.

करीना आणि सैफ अली खान यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलाबद्दल आता पर्यंत कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र, आता आजोबा रणधीर कपूर यांनी चुकून त्यांच्या नातवाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे.

करीनाचे वडील, अभिनेते रणधीर कपूर आपल्या धाकट्या नातवाचा पहिला फोटो शेअर करण्यास उत्सुक झाले आहेत. म्हणूनच त्यांनी नातवाचा पहिला फोटो शेअर करण्यासाठी चुकून आपल्या इन्स्टाग्राम हँडलचा वापर केला होता. यानंतर त्यांना आपली चूक लक्षात आली.

रणधीर कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून करीनाच्या दुसऱ्या मुलाचा फोटो शेअर केला होता. या फोटोत तैमूरच्या धाकट्या भावाचे दोन फोटो कोलाज करून रणधीर यांनी शेअर केले होते. मात्र, त्यांना तो फोटो सोशल मीडियावर शेअर करायचा नव्हता. कारण, शेअर केल्याच्या काही क्षणातच त्यांनी तो फोटो डीलीट केला.

त्यांनी तो फोटो डीलीट केला असलां तरी सुद्धा तो फोटो काही नेटकऱ्यांनी पाहिला होता. रणधीर यांनी हा फोटो डीलीट केल्या नंतर, नेटकऱ्यांनी लगेच तैमूरच्या धाकट्या भावाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले.

21 फेब्रुवारीला सकाळी 9 वाजता करीना कपूरने आपल्या दुसर्‍या मुलाला जन्म दिला होता. डिलीव्हरी आधीच सैफ आणि करिना यांनी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्याप्रमाणेच दुसरे बाळ माध्यमांच्या नजरेपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला होता. यात सैफ आणि करीना देखील बर्‍याच प्रमाणात यशस्वी ठरले आहेत.

दरम्यान, एका महिन्याच्या प्रसूतीच्या रजेनंतर करीनाने पुन्हा एकदा काम सुरू केले आहे. अलीकडेच करीना कपूर शूटसाठी सेटवर दिसली होती. करीना ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात ती आमीर खानबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे.

दुसरीकडे, सैफ अली खानने देखील ‘आदिपुरुष’च्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या चित्रपटात प्रभास ‘भगवान राम’, कृती सेनॉन ‘देवी सीता’ आणि सैफ ‘रावण’ यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.

 

महत्वाच्या बातम्या – 

सोनं ‘इतक्या’ रुपयांनी महागलं, जाणून घ्या काय…

तहानलेल्या आधुनिक काळातील कावळ्याने पाणी पिण्यासाठी लढवली…

काय सांगता! वजन वाढल्याने मांजरालाही आलं टेन्शन, पाहा…

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी दिसणार नव्या भूमिकेत,…