नारायण राणे यांच्या समर्थनार्थ फडणवीस मैदानात, म्हणाले…

मुंबई | सध्या राज्यात महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये जोरदार घमासान चालू आहे. विविध मुद्द्यांवरून विरोधक महाविकास आघाडीवर पक्षपातीपणाचा आरोप करत आहेत.

राज्याच्या राजकारणातील राणे कुटुंबीय आणि शिवसेनेतील वाद सर्वांना परिचित आहे. सध्या संतोष परब या शिवसैनिकावर हल्ला आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यी खिल्ली उडवल्याप्रकरणी आमदार नितेश राणे चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

काही दिवसांपूर्वी शिवसैनिक संतोष परब यांच्यावर कणकवली भागात हल्ला झाला होता. त्यानंतर शिवसेनेकडून हा हल्ला नितेश राणे यांनी केला असा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

संतोष परब यांनीदेखील राणे यांच्यावर गंभीर आरोप केले होेते. या सर्व प्रकरणात शिवसेनेनं राणे यांना घेरण्याचं काम केलं आहे. आता कणकवली पोलीस नितेश राणे यांच्या शोधात आहेत.

नितेश राणे सध्या कुठं आहेत हे विचारण्यासाठी कणकवली पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नोटीस बजावली आहे. यावरून राज्यातील राजकारण प्रचंड तापलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे.

राणेंच्या पाठिमागे भाजप खंबीरपणे उभा आहे. राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याऐवजी सरकार राणे यांच्यावर सुडबुद्धीनं कारवाई केल्याचं फडणवीस म्हणाले आहेत.

राज्यात पोलिसांना दरोडेखोर, बलात्काऱ्यांना पकडायला वेळ नाही. मात्र घरावरती जाऊन नोटीसा चिकटवतात. हा प्रकार अत्यंत चुकीचा आणि निंदनीय आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.

सिंधुदुर्गमध्ये सध्या अनेक वाईट काम चालू आहेत. या भागात अनेक काळे धंदे करण्यात येतात. मात्र पोलिसांना ते पकडण्यासाठी वेळ नाही. फक्त राणे यांना त्रास देण्याचं काम चालू आहे, या शब्दात फडणवीस यांनी राणे यांच्या समर्थनार्थ वक्तव्य केलं आहे.

दरम्यान, नारायण राणे यांना पोलिसांनी नोटीस बजावल्यानं आता राज्यात पुन्हा केंद्र सरकार विरूद्ध राज्य सरकार हा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. नारायण राणे हे सध्या मोदी सरकारमध्ये लघू व सुक्ष्म उद्योग मंत्री आहेत.

महत्वाच्या बातम्या-

 ख्रिसमस पार्टी भोवणार! अर्जुन कपूरसह ‘या’ 3 जणांना कोरोनाची लागण

नितेश राणेंना अटक होणार?; न्यायालयाचा नितेश राणेंना झटका

‘…हा धोक्याचा अलार्म आहे’; लॉकडाऊनबाबत राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, 500 चौरस फुटांच्या घरात राहणाऱ्या नागरिकांना दिलासा

“तुम्ही माझ्यावर दबाव आणू शकत नाही, पत्रातले धमकीवजा शब्द पाहून मी…”