मुंबई | गत महिन्यापासून राज्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुंबई महापालिकेतील वाद चर्चेत आहे. आता राणेंनी या प्रकरणात मोठं पाऊल उचललं आहे.
कोकणातील राजकारणात सर्वात जास्त वाद हा शिवसेना आणि राणे कुटुंबात असल्याचं राज्यानं वेळोवेळी पाहिलं आहे. अशातच आता हा वाद पुन्हा उफाळून आला आहे.
बीएमसीनं सलग दुसऱ्यांदा निर्वाणीची नोटीस पाठवल्यानं अखेर राणेंनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. परिणामी तणाव वाढण्याची शक्यता आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या मुंबईतील अधिश बंगल्यावरून सुरू झालेला वाद अद्यापही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. मुंबई महापालिकेनं कारवाई करण्यासाठी पावले उचलायला सुरूवात केली आहे.
राणेंच्या याचिकेवर आता मंगळवारी न्यायालयात सुनावणी होणार आहे. मंगळवारी राणेंच्या बंगला प्रकरणात महत्त्वाची घडामोड घडण्याची शक्यता आहे.
अधिश बंगल्याच्या बांधकामात सरकारी नियम मोडण्यात आल्याची तक्रार पालिकेला प्राप्त झाली आहे. म्हणून हा वाद वाढला आहे.
मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या पथकासह राणेंच्या बंगल्याची पाहणी केली होती. त्यानंतर त्यांना कारणे दाखवा अशी नोटीस देखील बजावली होती.
आता पालिकेनं पंधरा दिवसांमध्ये उत्तर देण्याची नोटीस असतानाच दुसरी नोटीस बजावली आहे. परिणामी राणेंच्या बंगल्यावर पालिका कारवाई करण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“30 वर्षांनी तुमच्या मुलींना पण हिजाब घालावा लागेल”; भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य
Weather Update: पुढील 12 तास धोक्याचे, ‘या’ भागात कोसळणार पाऊस
…म्हणून रात्री बारा वाजता खांद्याला बॅग लटकवून रस्त्यावर धावत होता मुलगा, पाहा व्हिडीओ
पेट्रोल डिझेलच्या दरात काय बदल झाला, वाचा एका क्लिकवर
‘… तर तिसरं महायुद्ध होणार’; युक्रेनच्या राष्ट्रपतींचं मोठं वक्तव्य