‘रंग बरसे’ गाण्यावर प्रशांत गडाखांनी पत्नीसह धरला ताल…!; पाहा व्हीडिओ

अहमदनगर |  नोव्हेंबर महिना संपला की शाळा आणि महाविद्यालयीन तरूणांना वेध लागतात ते स्नेहसंमेलनाचे…. असंच स्नेहसंमेलन पार पडलं ते सोनईच्या ज्ञानेश्वर कॉलेजमध्ये… ‘यशोरंग’ या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात प्रशांत गडाख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी त्यांच्या पत्नीसह ‘रंग बरसे’ या गाण्यावर ताल धरला.

‘रंग बरसे’ या अमिताभ बच्चन यांच्या ‘कभी कभी’ चित्रपटातल्या गीतावर प्रशांत गडाख आणि त्यांच्या पत्नी गौरी यांनी अप्रतिम डान्स करत स्नेहसंमेलनाला चार चाँद लावले. यावेळी उपस्थित तरूण तरूणींनी त्यांना टाळ्या आणि शिट्ट्यांनी जोरदार प्रतिसाद दिला.

तब्बल पाच मिनिटे डान्स करत प्रशांत गडाख यांनी अमिताभ बच्चन यांनी केलेल्या नृत्याचीच आठवण करून दिली. त्यांना त्यांची पत्नी गौरी यांनी देखील उत्तम साथ दिली.

दरम्यान, प्रशांत गडाख आणि गौरी यांचा डान्स सध्या जोरदार व्हायरल होत आहे. तसंच त्यांच्या अप्रतिम नृत्याचं कौतुक देखील होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-अजूनही देशात नथुराम गोडसेंची मानसिकता जिवंत आहे- नवाब मलिक

-CAA कायद्यामुळे महात्मा गांधीजींचं स्वप्न पूर्ण झालं- राष्ट्रपती

-आज असा नटलाय… लग्नात पण एवढा नटला नसशील; दादांच्या तुफान फटकेबाजीने उडाले हास्याचे कारंजे

-जालन्यात टोळक्याची प्रेमी युगुलाला मारहाण; पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय तरी काय??

-आम्हाला देशभक्ती पाहिजे… दारूभक्ती नको- डॉ. अभय बंग