रानू मंडल पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात, यावेळी केलं ‘हे’ मजेशीर काम

मुंबई | अभिनेता अल्लु अर्जुनचा पुष्पा हा चित्रपट खूप हिट झाला होता. यातील श्रीवल्ली हे गाणं खूप लोकप्रिय झालं. या गाण्यावर अनेक लोकांनी इंस्टावर रिल्स बनवल्या.

तेरी मेरी कहानी या गाण्याची गायिका रानू मंडल हिने देखील श्रीवल्ली या गाण्यावर डांस केलाय. तिचा डांन्स करतानाचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

रानू मंडल हिने या ब्लू टी शर्ट, लाल साडी आणि हातात एक दांडा घेतल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. रानू मंडल आधी रेल्वे स्टेशनवर बसून गाणी गायची. तिचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर एवढा व्हायरल झाला की ती एका रात्रीत स्टार बनली.

रानू मंडलचा हा व्हिडीओ पाहून प्रसिद्ध गायक हिमेश रेशमिया याने तिला त्याच्या चित्रपटात गाण्याची संधी दिली होती. त्यावेळी ती खूप चर्चेत होती.

रानू मंडलच्या तोडक्या-मोडक्या इंग्लिशमुळे लोकांनी तिची खिल्ली उडवली. तसेच तिच्या गाण्याच्या प्रमोशनवेळी ओवर मेकअप केल्यामुळे लोकांनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली होती.

रानू मंडल ही एक चांगली गायिका म्हणून खूप प्रसिद्ध झाली. परंतु आता काळ बदलला आणि रानू मंडलची अवस्था पूर्वीसारखीच झाली आहे.

दरम्यान, रानू मंडलवर एक आत्मचरित्र बनवण्यात येणार आहे. यामध्ये अभिनेत्री इशिका डे ही रानूची भूमिका साकारणार आहे. इशिका डे ही चित्रपट लाल कफ्तान आणि वेबसिरीज सैक्रेड गेम्स यामध्ये पाहायला मिळाली आहे.

महत्वाच्या बातम्या-  

Hyundai नं आणली सर्वात स्वस्त कार, टाटाच्या या कारचं मार्केट डाऊन होणार? 

“अहंकाराने त्यांनी गुजरातची दोन गाढवं म्हटलं होतं पण…” 

मोठी बातमी! अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, सचिन वाझेचा खळबळजनक दावा

“मुंबईचा दादा आम्हीच म्हणणाऱ्यांचा माज मुंबईकरच उतरवतील” 

ती गोष्ट माझी पाठ सोडत नाहीये; पॅानस्टार मिया खलिफाचा धक्कादायक खुलासा