मुंबई : बंगालमधील रानाधाट रेल्वे स्थानकावर गाणे म्हणणाऱ्या रानू मंडल यांच्या गाण्याचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. व्हायरल झालेल्या व्हीडिओमुळे रानू मंडल यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. लता मंगेशकर यांनी गायलेलं प्रसिद्ध गाणं ‘एक प्यार का नगमा है’ हे गाणं गाऊन सध्या सातवे आसमानपर असणाऱ्या रानू मंडल यांना भारताच्या गानकोकिळ लता मंगेशकर यांनी सल्ला दिला आहे.
माझ्या नावामुळे आणि गाण्यामुळे कोणाला प्रसिद्धी मिळत असेल तर मी स्वत:ला सौभाग्यशाली समजते, असं लता मंगेशकर म्हणाल्या आहेत. रानू मंडल यांच्या प्रसिद्धीबाबत बोलताना त्यांनी रानू यांना सल्लाही दिला आहे.
कोणाच्या गाण्याची कॉपी करु नये. यशाच्या शिखरावर पोहचायचं असेल तर एखाद्याची कॉपी करुन गाणे म्हटल्याने प्रसिद्धी दीर्घकाळ टीकू शकत नाही, असं लता मंगेशकर म्हणाल्या आहेत.
माझे, किशोर कुमार, मोहम्मद रफी, मुकेश आणि आशा भोसलेंचं गाणं म्हणून तुम्ही क्षणभर सर्वांना आकर्षित करु शकता. पण दीर्घकाळ नाही, असंही लता मंगेशकर म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या-
आपच्या ‘या’ आमदार काँग्रेसच्या वाटेवर??? – https://t.co/pCKNwMtEQd @INCIndia @LambaAlka @AamAadmiParty
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 3, 2019
पालकमंत्री राम शिंदेंच्या अडचणीत वाढ, भाजपकडून ‘हा’ नेता निवडणूक लढवणार??? – https://t.co/RLM6ns0LtO @RamShindeMLA @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 3, 2019
कसोटी रँकिंगमध्ये विराटची घसरण; स्मिथ पहिल्या स्थानावर! – https://t.co/wBwvApS7Z2 @ICC @stevesmith49 @imVkohli
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 3, 2019