मी वयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला; अभिनेता रणवीर सिंगची कबुली!

मुंबई : रणीवीर सिंग हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असून त्याने बाजीराव मस्तानी, पद्मावत यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. त्याने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला एका कंडोमच्या जाहिरातीत काम केले होते. रणवीरने या जाहिरातीच्या संदर्भात डेक्कन क्रोनिकल या वेबसाईटला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याने त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा उलगडा केला.

मी 12 वर्षांचा असेन त्यावेळी मी सगळ्यात पहिल्यांदा सेक्स केलं होतं. मी केवळ उत्सुकतेपोटी माझ्यापेक्षा वयाने कित्येक वर्षं मोठ्या असलेल्या महिलेसोबत शरीरसंबंध ठेवला होता, अशी कबुली रणवीर सिंगने दिली आहे.

मी प्रत्येक गोष्ट खूपच कमी वयात केली. मी काळाच्या पुढे होतो असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही, असं रणवीर सिंगने मुलाखतीमध्ये बोलताना सांगितलं आहे.

मी एकदा माझ्या कारमध्ये बसलो होतो. त्यावेळी मी होर्डिंगवरील विविध जाहिराती पाहात होतो. होर्डिंगवर कंडोम वगळता अनेक जाहिराती मला दिसत होत्या. त्यावेळी मी विचार केला की सेक्सच्या बाबतीत आपल्या समाजाचा दृष्टिकोन आता बदलत आहे. या विषयावर खुलेपणाने चर्चा केली जात आहे, असं रणवीरने सांगितलं आहे.

मी माझं काम सांभाळणाऱ्या लोकांना ड्युरेक्ससोबत जाहिरातीबाबत चर्चा करायला सांगितलं. खरं तर मी त्यावेळी खूप मोठी रिस्क घेतली होती. माझ्या या जाहिरातीचं कौतुक तरी केलं जाईल अथवा मला लोक शिव्या तरी घालतील हे माझ्या डोक्यात पक्क होतं, असं रणवीरने सांगितलं आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-राज ठाकरेंना ईडीची नोटीस; ठाण्यात मनसे कार्यकर्त्याची आत्महत्या

-भारताविरूद्ध बोलताना सांभाळून बोला; डोनाल्ड ट्रम्प यांचा इम्रान खान यांना सल्ला!

-अटकेच्या भीतीपोटी पी. चिदंबरम घरातून बेपत्ता!

-राष्ट्रवादीला मोठा धक्का; खासदार उदयनराजे भोसले भाजपच्या वाटेवर???

-भारतीय संघात नाही पण ‘हा’ खेळाडू ‘या’ कारणामुळे असणार संघासोबत!