मुंबई | बॉलीवूडचा प्रसिद्ध निर्माता करण जोहर(karan Johar) पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आपला फेमस ‘कॉफी विथ करण 7’ हा नवा सिझन घेऊन भेटीस येत आहे. याचा पहिला एपिसोड ज्यात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट गेस्ट म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना अभिनेता रणवीर सिंगने सेक्स लाईफबाबत मोठा खुलासा केला आहे.
आम्ही आमच्या व्हॅनिटी व्हॅनमध्येही सेक्स केलं होतं आणि माझ्याकडे सेक्ससाठी वेगवेगळ्या प्लेलिस्ट आहेत, असं रणवीर सिंगने यावेळी बोलताना सांगितलं आहे. आलियानेही तिच्या सेक्स लाईफवर भाष्य केलंय.
लग्नाच्या पहिल्या रात्री कोणी काहीच करत नाही. कारण लग्नाच्या एवढ्या सगळ्या विधी झाल्यानंतर आपण थकलेले असतो. त्यामुळे ‘सुहागरात’ नावाची कोणतीही गोष्ट लग्नाच्या पहिल्या रात्री नसते. लग्नाच्या बाबतीत हे सर्वात मोठी खोटी गोष्ट आहे. पण हे सगळं रणवीरला लागू होत नाही. तो नेहमीच उत्साही असतो, असं आलियाने म्हटलं आहे.
दरम्यान ,यंदा शोमध्ये बॉलिवूडचे आघाडीचे खान एकत्र येणार असं म्हटलं जातंय. शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान हे कलाकार शोमध्ये हजेरी लावणार आहेत.
तिन्ही खानचे सिनेमे येत्या वर्षात प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. त्यामुळे ते तिघं प्रमोशनसाठी ‘कॉफी विथ करण’मध्ये हजेरी लावतील अशी चर्चा आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मध्यावधी निवडणुकीबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
‘… त्यामुळे नांदा सौख्यभरे अशाच शुभेच्छा देतो’, छगन भुजबळांचा शिंदे सरकारला टोला
शिंजो अबे यांच्यावर हल्ला करणारी ‘ती’ व्यक्ती ताब्यात, महत्त्वाची माहिती समोर
पेंग्विनची चेष्टा यात्रा म्हणत निलेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर घणाघात
काळजी घ्या! राज्यात मुसळधार पावसाच्या सरी कोसळणार, ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी