…तर सुशांत सिंह राजपूतचं प्रकरण विरोधकांच्या अंगलट येईल- रावसाहेब दानवे

जालना | प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंहच्या प्रकरणावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करत आहेत. सध्या सुशांतचा तपास हा मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे देण्यात आला आहे. सीबीआयही वेगाने तपास करत आहे. अशातच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी या प्रकरणातील भाजप विरोधी बोलणाऱ्यांना इशार दिला आहे.

सुशांतच्या प्रकरणाशी भाजपचा कोणताही संबंध नाही आणि भाजपवर आरोप हे फक्त लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी होत आहेत . मात्र सुशांतच्या प्रकरणात भाजप विरोधी जो बोलत आहेत त्यांच्या हे अंगलट येणार असल्याचं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ज्या पद्धतीने नवनवीन खुलासे होऊन अनेक गोष्टी समोर येत आहेत त्यामुळे संशयाचं वातावरण निर्माण झालं आहे. याबाबतीत आम्हाला कोणताही ठोस दावा करायचा नाही. मात्र, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने सीबीआय चौकशी करुन सत्य लोकांसमोर आणावं असं दानवे यांनी सांगितलं आहे.

सुशांतच्या प्रकरणाशी चौकशी होऊ नये असं कुणाला वाटत असेल तर मग संशय घ्यायला जागा आहे  मात्र तसं काही कोणत्याही नेत्याला वाटत नाही, असंही रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

काँग्रसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर अनेक आरोप केले आहेत. यामध्ये सध्या संशयाच्या भोवऱ्यात अडकलेला सुशांतचा जवळचा मित्र संदीप सिंहवरून भाजपला निशाण्यावर धरलं आहे.

संदीप सिंहचा मुख्य बॉस कोण?, असे अनेक प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात जोर धरू लागले आहेत. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चित्रपटासाठी संदीप सिंहला गुजरात सरकराने किती रूपयाचं टोकण दिलं होतं?, असा सवाल सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.

संदीप सिंहची मोठ्या प्रमाात भाजपशी जवळीक आहे. संदीपची एक कंपनी तोट्यात असताना त्याच्यामध्ये आणि विजय रुपाणी यांच्या गुजरात सरकारमध्ये 177 कोटींचा सामंजस्य करार झाला असल्याचंही बोललं जात आहे. त्याच्यावरून भाजपला संदीप सिंहवरून काँग्रेसने टारगेट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

काँग्रेसनंतर आता भाजपमधील पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर!

“मंदिरं उघडण्याच्या प्रश्नी घंटानाद आंदोलन करत विरोधकांनी सोशल डिस्टन्सिंगची काशी केली”

‘राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचा जातीय दाखला बोगस’, शिवसेना नेत्याचा आरोप

सीबीआयनं सुशांत संबंधित ‘तो’ खासगी प्रश्न विचारताच रियाचा चढला पारा; म्हणाली…

मला मुंबई पोलिसांची भीती वाटते, सुरक्षा द्यायची असेल तर केंद्राने किंवा ‘या’ राज्याने द्यावी- कंगणा