जालना : येत्या काळात मुख्यमंत्रिपदाबाबत विचार करणार असल्याचे सूचक वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले आहे. जालना येथे विविध महामंडळांवर नियुक्त झालेल्या सदस्यांचा ओबीसी समाजातर्फे जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते.
एका समर्थकाने सत्कार समारंभात जालन्याचा मुख्यमंत्री हवा आहे, अशी मागणी केली. तेव्हा पुढच्या काळात मुख्यमंत्री पदाचे बघू, असे दानवे यांनी म्हटले. सरपंचपदापासून केंद्रीय मंत्र्यांपर्यंत सगळी पदे भोगून झाली. आता कोणतीही अपेक्षा राहिली नाही असेही दानवे म्हणाले. मात्र, मुख्यमंत्रिपदाबाबत पुढे विचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वीच रावसाहेब दानवे यांनी भाजपची तुलना वॉशिंग मशीनशी केली होती. त्यांनी म्हटले आहे की, आमच्याकडे वॉशिंग मशीन आहे.
बाहेरून एखादा आमदार आला की, आम्ही त्याला या वॉशिंग मशीनमध्ये टाकतो. त्याला स्वच्छ धुतो आणि मग आमच्या लाईनीत उभं करतो. या वॉशिंग मशीनमध्ये गुजरातची निरमा पावडर वापरली जाते. त्यामुळेच तो माणूस स्वच्छ होतो आणि आपल्यात येतो, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटले होते.
महत्वाच्या बातम्या-
आज कुलभूषण जाधव यांना मिळणार दूतावासाची मदत – https://t.co/ol5FrUEoeb #KulbhushanJadhav
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 2, 2019
“शरद पवार तुम्ही 15 वर्षात केलेल्या कामाचा हिशोब द्या” – https://t.co/lijnXjp0UH @AmitShah @PawarSpeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 2, 2019
सरकार जिथं हात लावतं, तिथं सत्यानाश होतो- नितीन गडकरी
https://t.co/hcYU96KNyv #म— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 2, 2019