औरंगाबाद | हे सरकार जेलमधून आणि घरातून काम करत. यांचे दोन मंत्री जेलात आणि मुख्यमंत्री घरात आहेत, असा टोला भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.
औरंगाबादकरांचे प्रश्न मांडण्यासाठी भाजपने आज भव्य जल आक्रोश मोर्चाचे आयोजन केलं. यावेळी रावसाहेब दानवे बोलत होते.
कोरोना काळात त्यांनी काय घोषणा दिली? माझं कुंटंब माझी जबाबदारी. पण, तुम्ही जबाबदारी स्विकारली नाही. आमचे लोकं जनतेत गेले. तेव्हा फडणवीस म्हणाले होते, मुख्यमंत्री घरात आणि आम्ही तुमच्या दारात. त्यानंतर मुख्यमंत्री घराबाहेर पडले, असं म्हणता दानवेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.
आता आमची जनतेकडून एकच अपेक्षा आहे, जनतेनं यांना अद्दल घडवावी. हा मोर्चा फक्त भाजपचा नाही, आम्ही लोकांचा आवाज ऐकला आणि तो आवाज सरकारपर्यंत नेण्याची जबाबदारी आमची आहे, असं ते म्हणालेत. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, ठाकरे सरकार, मुख्यमंत्री, शेतकरी
मुख्यमंत्री सोलापूरला गेले, त्यांना शेतकरी म्हणाले- देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अतिवृष्टी झाली, त्याची मदत मंजूर झालीये पण अजून मिळाली नाही. आम्हाला मदत करा. तर, मुख्यमंत्री म्हणाले, माझे कुटुंब माझी जबाबदारी. त्यानंतर मुख्यमंत्री उस्मनाबादला गेले, तिथे हॉटेलवाले भेटले, ते म्हणाले- कोरोना काळात कर्ज काढलं, कोरोना आला आणि पैसे बुडाले. केंद्राने पॅकेज दिलं, तुम्ही आम्हाला मदत करा. हे सगळीकडे गेले आणि म्हणाले माझं कुटुंब माझी जबाबदारी. आरे पण, तु्म्ही जबाबदारीपासून पळ काढला, अशी टीकाही दानवेंनी केली.
महत्त्वाच्या बातम्या-
अकरावीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!
“मला राजनं सांगितलं होतं महाराष्ट्रात राहतो तर मराठी बोलता आलं पाहिजे”
मोठी बातमी समोर; शिवसेनेचं निमंत्रण फेटाळत संभाजीराजे कोल्हापूरला रवाना
“पक्षात 12 वाजता या सांगून तुमची काय किंमत ठेवली?, लाथ मारा त्या खासदारकीला”