जालना | कुणी मायीचं लाल असेल तर माझा भ्रष्टाचार काढून दाखवा, असं खुलं आव्हान भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी शिवसेना नेते अर्जुन खोतकरांना दिलं आहे. ते जालन्यात माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते अर्जुल खोतकरांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. नंतर अर्जुन खोतकर यांनी या सर्व प्रकरणात किरीट सोमय्या यांचा बोलवता धनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे असल्याचं म्हटलं होतं.
अर्जुन खोतकरांनी केलेल्या टीकेला रावसाहेब दानवे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मी गरिब माणूस आहे, माझ्या नावाने बोंबलून फायदा नाही, असं रावसाहेब दानवेंनी म्हटलं आहे.
बुथ नव्हते, त्या गावचा मी आज केंद्रात मंत्री आहे, असंही दानवे म्हणाले आहेत. मी कोणावर कशाचाही आरोप केलेला नाही, माझ्या अंगाला कुठलाही भ्रष्टाचार चिटकलेला नाही आणि असेल तर कुणी मायीचे दूध पिलेला असेल तर माझा भ्रष्टाचार काढून दाखवावा, असं आव्हानच रावसाहेब दानवेंनी दिलं आहे.
अर्जुन खोतकर यांची इडीकडून चौकशी करण्यात आली होती. रामनगर साखर कारखाना आणि कृषी उत्पन्न बाजार समिती जालना या ठिकाणी गैरकारभार झाल्याची तक्रार भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी याआधी केली होती. सोमय्यांनी केलेल्या आरोपांनंतर खोतकरांनी दानवेंवर निशाणा साधला होता.
आता पुन्हा अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवेंमधला जुना संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे. भाजप आणि शिवसेनेमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
“देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच मी केंद्रीय मंत्री झालो”
‘मला BJP कडून केंद्रीय मंत्रिपदाची ऑफर होती’; ‘या’ नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
“सरकारी यंत्रणांचा ससेमिरा लावून आमचा छळ सुरुये”
महाराष्ट्रात Lockdown लागणार?; अजित पवारांचं मोठं वक्तव्य…
Omicron | ‘कोरोनाचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही…’; धक्कादायक माहिती समोर