मुंबई | राज्यात सध्या पदभरती घोटाळ्यावरून जोरदार राजकारण पेटलं आहे. महाविकास आघाडीवर भाजपकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. अशात आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
राज्यात पुणे पोलीस सध्या म्हाडा भरती, टीईटी परीक्षा, आरोग्य भरती प्रक्रिया या परीक्षेतील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा तपास करत आहेत. परिणामी राज्य सरकारला टीकेला तोंड द्यावं लागत आहे.
राज्यात ज्या ज्या विभागात परीक्षेत घोटाळे झाले त्या घोटाळ्यात त्या त्या मंत्र्यांचा आणि मुख्यमंत्र्यांचा हात असल्याचा आरोप केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे.
राज्यातील परीक्षा घोटाळ्यात त्या त्या खात्याचे मंत्रीच जबाबदार असून राज्याचा मुखीया देखील परीक्षा घोटाळ्याला जबाबदार असल्याचा आरोप दानवे यांनी केला.
आपले राज्य मुख्यमंत्र्यांविना सुरू असून राज्य फक्त जनतेच्या भरवशावर सुरू असल्याची टीका राज्य सरकारवर दानवे यांनी केली आहे.
राज्यात काही दिवसांपूर्वी मोठा पदभरती घोटाळा उघडकीस आला होता. परिणमी सरकारला यावरून मोठ्या टीकेचा सामना करावा लागला होता. त्यांनतर आता या घोटाळ्याचा तपास चालू आहे.
टीईटी परीक्षा घोटाळ्याप्रकरणी परीक्षा परिषदेचा निलंबित अध्यक्ष तुकाराम सुपे हा सध्या पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे. सुपे याच्याकडून तब्बल 3 कोटींहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली होती.
पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या पुणे पोलीस हा तपास करत आहेत. या तपास योग्य दिशेनं चालल्याचं राज्य सरकारनं सांगितलं आहे.
रावसाहेब दानवे यांनी परीक्षा घोटाळ्यात चक्क राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं नाव आल्यानं सर्वत्र खळबळ माजली आहे. दानवे यांच्या टीकेवर महाविकास आघाडीकडून प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यात मोठा पदभरती घोटाळा झाल्याचं पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या
WHOच्या मुख्य वैज्ञानिकांनी भारताला दिला ‘हा’ मोलाचा सल्ला, म्हणाले…
“देशात कोरोनाची तिसरी लाट भाजपमुळेच आली”
“चार दिवसात कोकणात काय काय घडलं अमित शहांना सर्व सांगणार”
‘… तर 2022 मध्ये कोरोना संपणार’; WHO प्रमुखांनी दिली दिलासादायक माहिती
गुड न्यूज! नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी LPG सिलेंडर ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त