Top news महाराष्ट्र मुंबई

“बाबरी मशीद पडली तेव्हा मी तिथं होता, तिथं एकही शिवसैनिक नव्हता”

raosaheb danve

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav thackeray ) यांनी वांद्रे येथील सभेत भाजपला टार्गेट केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपवर सडकून टीका केली. आता या टीकेला भाजप नेत्यांकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे.

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेकडे सर्वजण डोळे लावून बसले होते, मात्र सर्वांची निराशा झाली आहे, अशी टीका दानवेंनी केलीये.

बाळासाहेब ठाकरेंच्या काळात हिंदुत्व सोडलं नसल्यांची सांगण्याची वेळ आली नव्हती. हिंदुत्व सोडलं नाही, भाजपला सोडलं म्हणता त्यावरुन तुम्ही हिंदुत्व सोडलं हे समजतं, अशी टीका रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरेंवर केलीये.

हिंदुत्वाच्या गप्पा मारणं आता तुम्ही बंद करा, असा सल्ला रावसाहेब दानवे यांनी दिला. बाबरी मशीद पडली तेव्हा मी तिथं होता. एकही तिथं शिवसैनिक तिथं नव्हता, असं रावसाहेब दानवे म्हणाले.

दरम्यान, फडणवीसांनीही उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा… असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता जनतेसमोर जावं, जेव्हा निवडणुका होतील तेव्हा जनता यांना कोण गदाधारी आहे हे दाखवून देईल, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Monsoon Update | मान्सून संदर्भात मोठी अपडेट समोर 

शरद पवारांचा नरेंद्र मोदींना गंभीर इशारा, म्हणाले… 

काँग्रेसचं मिशन 2024; राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय 

“…नाहीतर तुमचे पंचवीस आमदारही निवडून आले नसते” 

जगाने आणखी एक दिग्गज गमावला; ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू