मुंबई | एकनाथ शिंदेंचं बंड ते महाराष्ट्रातील सत्तांतर अशा अनेक घडामोडींमुळे सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. बाळासाहेबांचं नाव व फोटो वापरण्यावरून सध्या शिवसेना व शिंदे गटात शाब्दिक युद्ध सुरू आहे.
बंडखोरीमुळे सुरू झालेल्या सत्तासंघर्षानंतर उद्धव ठाकरेंनी सामनाला मुलाखत दिली. संजय राऊतांनी विचारलेल्या प्रश्नांची उद्धव ठाकरेंनी रोखठोक उत्तरं दिली.
इतकंच नाही तर फोटो वापरायचा असेल तर तुमच्या वडिलांचा वापरा. माझ्या वडिलांच्या फोटोवर मतं मागू नका, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर रावसाहेब दानवेंनी सडकून टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरेंचे वडिल असले तरी ते सगळ्या महाराष्ट्राचे होते, असं रावसाहेब दानवे म्हणाले.
महाराष्ट्राचा राजा माणूस म्हणून बाळासाहेबांना देश ओळखतो. राजाच्या पोटी आलो म्हणून स्वत:ला राजा समजण्याचं कारण नाही, असा घणाघात रावसाहेब दानवेंनी केला आहे.
दरम्यान, राजा पोटी आल्याने नाही तर मतपेटीतून ठरत असतो, असा टोला देखील रावसाहेब दानवेंनी लगावला आहे. तर राज्यातील जनतेनं भाजप आणि शिवसेनेच्या युतीला मतदान केल्याचा पुनरूच्चार देखील दानवेंनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘उद्धव ठाकरे दोन वेळा घरातून पळून गेले होते’, नारायण राणेंचा गौप्यस्फोट
“काय ते प्रश्न.. काय ती उत्तरं.. काय तो घरगुती कार्यक्रम.. एकदम ओक्के”
“उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचं अस्तित्व भाजपमुळेच आहे”
“तुमच्यात कर्तृत्व नाहीये, तुम्ही मर्द नाहीत, शिवसेनेच्या बापाचा फोटो लावून भीक मागू नका”
नक्की कुठे चुकलं?, उद्धव ठाकरे म्हणाले ‘गुन्हा माझाय, चूक माझी आहे’