औरंगाबाद | आज नगरपंचायतची मतमोजणी असून सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. या दरम्यान औरंगाबाद येथून एक धक्कादायक निकाल समोर आला आहे.
रावसाहेब दानवे (Central Minister Raosaheb Danve) यांना शिवसेना नेते आणि राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जोराचा झटका दिला आहे.
सोयगाव नगरपंचायतीत आपण जिंकणार असा दावा करणाऱ्या दानवेंना (Abdul Sattar vs Raosaheb Danve) या निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.
सोयगाव नगरपंचायत निवडणुकीत शिवेसेनेला 17 पैकी तब्बल 9 जागांवर विजय मिळाला आहे. तर भाजपला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावं लागलं आहे. सोयगाव नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेना आणि भाजप यांच्यात टोकाचा संघर्ष बघायला मिळाला होता.
औरंगाबादच्या सोयगाव नगरपंचायत दोन उमेदवारांना समसमान मेत पडल्याने ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. त्यात शिवसेनेचे उमेदवार रमेश बोबडे विजयी झाले आहेत.
जाफराबाद नगर पंचायतमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसला प्रत्येकी 6 जागांवर विजय मिळाला आहे. या ठिकाणी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना धक्का बसला आहे. या ठिकाणी भाजपाचा फक्त एक उमेदवार निवडून आला आहे.
नाशिकच्या सुरगाणा नगरपंचायत निवडणुकीत कृषी मंत्री दादा भुसे यांना धक्का बसला आहे. या नगरपंचायतीत भाजप 8 तर शिवसेना 6 जागांवर विजयी झाली आहे. माकपने 2 तर राष्ट्रवादीने एका जागेवर विजय मिळवला आहे.
या नगरपंचायतीत भाजप सत्ता स्थापनेच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे मंत्री असून ही नगरपंचायत राखता न आल्याने दादा भुसे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
नारायण राणेंना शिवसेनेचा ‘दे धक्का’, शेवटच्या क्षणी एका आकड्याने…
ज्युनिअर आर. आर. पाटलांचा धमाका, एकहाती सत्ता मिळवत विरोधकांना ‘बाप’ दाखवला!
रोहित पवारांचा राम शिंदेंना धक्का; कर्जत नगरपंचायतीवर मिळवली एकहाती सत्ता
वरूण धवनला मोठा धक्का; जवळच्या व्यक्तीचं हृदय विकाराच्या झटक्याने निधन
दहावी, बारावी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; लवकर अर्ज करा